Ginger Price Hike | मोदी है तो मुमकिन है? टोमॅटोनंतर आल्याचे दर सुद्धा 400 रुपये झाले, स्वयंपाकघराचा दैनंदिन खर्च वाढला
Ginger Price Hike | टोमॅटोपाठोपाठ आता आल्याने घरातील जेवणाच्या बजेटला मोठा धक्का बसला आहे. आल्याचे दर अभूतपूर्व पातळीवर पोहोचले असून ते ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रापासून कर्नाटकातील खुल्या बाजारात एक किलो आल्याचा भाव आता ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. कर्नाटक हे भारतातील आले उत्पादनाचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. २०२२ या आर्थिक वर्षात मध्य प्रदेश हे भारतातील आल्याचे सर्वात मोठे उत्पादन होते. मुंबई पुण्याच्या बाजारांमध्ये देखील तीच स्थिती पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी