Global Slowdown Darken | अमेरिकेत पीएमआय डेटानुसार आर्थिक मंदीचे स्पष्ट संकेत, संपूर्ण जगासमोर मंदीचा धोका
जुलैच्या सुरुवातीच्या पीएमआय डेटाने अमेरिकेच्या युरो झोन आणि जपानपर्यंतच्या रेंजमध्ये धोक्याची घंटा वाजविली आहे. शुक्रवार, २२ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या या आकडेवारीत या सर्व क्षेत्रांतील व्यावसायिक घडामोडींमध्ये कमालीची घट होण्याची चिन्हे तर दिसत आहेतच, शिवाय संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या गर्तेत लोटण्याची शक्यताही अधिक गडद झाली आहे. या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील आर्थिक घडामोडींमध्ये दोन वर्षांत प्रथमच घट झाली आहे. युरो झोनमध्ये जवळपास वर्षभरात पहिल्यांदाच असे घडले आहे. ब्रिटनमध्ये विकासदरही १७ महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. पश्चिमेतील देशांची ही स्थिती आहे, त्यामुळे अतिपूर्वेतील जपानमधील विकासदराच्या अंदाजात घट होण्याची चिन्हे आहेत.
3 वर्षांपूर्वी