Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस?
Google Messages | गुगलने आरसीएससाठी फोन उत्पादक आणि वाहकांशी हातमिळवणी केली आहे. रिच कम्युनिकेशन स्टँडर्ड अंतर्गत, वापरकर्ते ग्रुप चॅट तयार करू शकतात, टायपिंग इंडिकेटर्स पाहू शकतात आणि वाचन पावत्या शोधू शकतात. वापरकर्ते गुगल संदेशांमध्ये ते सहजपणे सक्रिय करू शकतात. यासाठी तुम्ही गुगल मेसेजवर जाऊन वरच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर टॅप करून आरसीएस ऑन करू शकता. यानंतर मेसेज सेटिंगवर जा. त्यानंतर चॅट फीचरमध्ये गेल्यानंतर इनेबल चॅट फीचर अॅक्टिव्हेट करावं लागेल. यामध्ये युजर्संना विविध प्रकारचे युनिक फीचर्स देण्यात येणार आहेत.
2 वर्षांपूर्वी