महत्वाच्या बातम्या
-
MLA Gopichand Padalkar | आ. पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले - श्री. मार्तंड देवस्थान
देवस्थानाच्या जमिनी बाबत सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पडळकरांच्या या आरोपावरुन आता श्री. मार्तंड देवस्थानाने आपले मत मांडले आहे. जेजुरी येथील श्री. मार्तंड देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा ताबा नसून कृपया देवस्थानाच्या कामामध्ये कोणीही राजकारण करू नये, अशा शब्दात श्री. मार्तंड देवस्थानने या जमिनींवर राजकीय ताबा असण्याच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
4 वर्षांपूर्वी -
परवानगी मिळण्यासाठी गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा आणि शेतीमातीसाठी एकत्र यावं लागणार आहे, अशी साद घालत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या विरोधात भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ॲागस्ट रोजी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे बंदी झुगारून शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांवर टीका करण्यासाठीच पडळकरांना आमदारकी | त्यांच्या टीकेचा दर्जा उत्तर देण्यासारखाही नसतो - रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर-मंगळवेढा | पडळकरांनी आवताडेंना बारामतीतील निकालाची आठवण करून दिली?
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची निवडणुक १७ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली होती. सध्या भारत भालके यांच्या कुटुंबियांबद्दल मतदारसंघात भावनिक वातावरण असल्याने त्याचा फायदा भगिरथ भालके यांना होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या दोन्ही बाजूंनी प्रचाराची तयारी सुरु झाली असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात कार्यक्रमाला आले | संधी मिळताच आंदोलनाचा ताबा | भाजप युवा कार्यकर्तेही सामील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्वप्रथम पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर आदोलनाला उतरले. हे आंदोलन नियोजित नसल्याने त्याची माध्यमांना देखील ते पेटल्यानंतर कल्पना मिळाली. त्याच वेळी योगायोगाने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात एका पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे काही युवा कार्यकर्ते विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना भेटली. त्याच वेळी त्यांना संधी मिळाली आणि पत्रकार परिषद घेण्याऐवजी ते आंदोलनात सामील झाले. त्यांच्यासोबत अनेक भाजप कार्यकर्ते देखील मास्क लावून आंदोलनात उतरल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनात दुपारी 3 ते 4 च्या सुमारास पडळकर यांची एन्ट्री झाली.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब – गोपीचंद पडळकर
जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलं असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोना काळ असल्यानं त्याचं उद्घाटन हे रखडलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पडळकर पुन्हा वादात, गोपाळ गणेश आगरकर जयंतीनिमित्ताने चक्क लोकमान्य टिळकांचा फोटो
काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच वाद उफाळून आला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसहित भाजप नेत्यांनी सुद्धा पडळकरांना सुनावले होते.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोप येणार नाही - मंत्री हसन मुश्रीफ
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोपीचंद पडळकरांना पवारांविरोधातील वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीच्या निषेधार्थ आज (गुरुवार) पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. मंडई परिसरात पडळकर यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
मोदी साहेबांवर किती वेळा घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादी-काँग्रेसवाले बोलले आहेत- निलेश राणे
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, गोपीचंद पडलकरांचं धक्कादायक विधान
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS