Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस?
Graphite India Share Price | ग्रेफाइट इंडिया या भारतातील ग्रेफाइट इलेक्ट्रोड्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 16.67 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी देखील या स्टॉकमधून चांगली कमाई केली आहे. स्टीलमधील वाढती मागणी विचारात घेता ब्रोकरेज फर्मने स्टॉक वाढीचा अंदाज व्यक्त केलं आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या कंपनीचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 17 टक्क्यांनी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणाले. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 380.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी