Gratuity New Rules | आता तुम्हाला 1 वर्षाच्या नोकरीनंतरही ग्रॅच्युइटी मिळेल, 75 हजार कसे मिळतील पहा
केंद्र सरकार लवकरच देशात कामगार सुधारणांसाठी 4 नवे कामगार कायदे लागू करू शकते. कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत यासंदर्भात लेखी माहिती दिली आहे. नवा कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन, रजा, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये बदल होणार आहे. हे कायदे लागू झाल्यानंतर कोणत्याही संस्थेत सलग 5 वर्षे काम करण्यासाठी ग्रॅच्युइटीचे बंधन संपुष्टात येईल. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, नवीन कामगार कायदा लागू होताच ही व्यवस्था अस्तित्वात येईल, एवढे निश्चित आहे.
2 वर्षांपूर्वी