Gratuity Salary Formula 2023 | पगारदारांच्या ग्रॅच्युइटीचे प्रमाण कसे ठरवले जाते? या सूत्राने कळेल ग्रॅच्युइटी किती लाख रुपये मिळेल
Gratuity Salary Formula 2023 | जर तुम्ही एखाद्या कंपनीत ठराविक कालावधीसाठी काम केले असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळेल. बहुतांश कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलली तर त्यांना कंपनीकडून ग्रॅच्युइटी मिळण्याची अपेक्षा असते. ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी सरकारने कोणत्या प्रकारचे निकष निश्चित केले आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते आणि किती वर्षे काम केल्यानंतर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते? खरं तर ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याला कंपनीकडून मिळणारे बक्षीस. कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी ंची पूर्तता केल्यास विहित सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युइटी दिली जाईल.
1 वर्षांपूर्वी