IPO Investment | IPO बाजारात येण्यापूर्वीच शेअर ग्रे मार्केटमध्ये 33 रुपयांच्या प्रीमियमवर, मजबूत परताव्याचे संकेत, पाहा पूर्ण तपशील
IPO investment | ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, आज Electronic Mart India कंपनीचे शेअर्स 33 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच, जर IPO ओपनिंग मध्ये कंपनीचे शेअर्स किंमतीच्या अप्पर बँडवर शेअर्सचे वितरीत झाले तर आजच्या ग्रे मार्केट मधील किमतीनुसार,हा स्टॉक 92 रुपये प्रति शेअर बाजार भावाने सूचीबद्ध होऊ शकतो. गेल्या आठवड्यात गुरुवारी ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart India कंपनीचे शेअर्स 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. हा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तुम्ही हा IPO मुदत संपण्याच्या आत सबस्क्राइब करू शकता. त्याच वेळी, Electronic Mart India कंपनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केली जाईल.
2 वर्षांपूर्वी