Greenply Industries Share Price | 1 लाख रुपयांवर 1.26 कोटी रुपये परतावा देणारा शेअर, पुढेही तेजी, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Greenply Industries Share Price | ‘ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज’ ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्लायवूड बनवणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी ‘ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 5.55 टक्के वाढीसह 146.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात शेअरची किंमत 6.67 टक्के वाढली आहे. स्टॉक सध्या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किंमत पातळीपासून 24 टक्के वाढू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Greenply Industries Share Price | Greenply Industries Stock Price | BSE 526797)
2 वर्षांपूर्वी