महत्वाच्या बातम्या
-
भाजपसाठी धोक्याची घंटा, मोदींची हवा फक्त गुजरातमध्ये शिल्लक, 3 पैकी हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेत जनतेने मोदींना नाकारलं
Gujarat Assembly Election Result | देशाचं लक्ष लागल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभआ निवडणुकीचे एकूण कल समोर आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे, पण त्यासाठी पंतप्रधान मोदींना गुजरातमध्ये ठाण मांडून बसावं लागलं आणि ५० हुन अधिक सभा घ्याव्या लागल्या होत्या. तर हिमाचल प्रदेशातली सत्ता मात्र भाजपला गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. मीच उमेदवार असे समजून मतदान करा असं करूनही हिमाचल प्रदेशातील मतदारांनी भाजपाला सत्तेतून पायउतार केल्याने तिथे मोदींची राजकीय फेसव्हॅल्यू संपल्यात जमा आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. तत्पूर्वी, म्हणजे काल दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीतही जनतेने भाजपाची १५ वर्षांपासूनची सत्ता उलटून टाकली आणि तिथेही महत्वाच्या निवडणुकीत मोदींचा चेहरा नाकारण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभा निवडणूक निकालात मोदींची हवा, तर हिमाचल प्रदेशात ठरले फुसका बार, काँग्रेस दणदणीत विजयाकडे
Gujarat Assembly Election Result | गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे ताजे कल आणि निकालामुळे भारतीय जनता पक्ष सलग सातव्यांदा राज्यात सत्ता काबीज करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांतच भाजपने राज्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. 2017 च्या निवडणुकीत 99 जागांपर्यंत कमी झालेल्या भाजपला यावेळी दोन तृतीयांश जागांसह 151 जागा जिंकता येणार आहेत, हा राज्याच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.
2 वर्षांपूर्वी -
मतदार रोजगार, महागाईवर बोलू लागताच शहांकडून सभांमध्ये गुजरात दंगलीची आठवण, म्हणाले.. असा धडा शिकवला की..
Gujarat Assembly Election 2022 | भाजप सरकारांनी राज्यात अखंड शांतता प्रस्थापित केली आहे, असा दावा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील निवडणूक प्रचारसभेत 20 वर्ष जुन्या जातीय दंगलीची आठवण करून दिली आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील निवडणूक प्रचारसभेत शुक्रवारी अमित शहा म्हणाले की, “काँग्रेसने ही सवय बिघडवली होती, त्यामुळे 2002 मध्ये दंगली झाल्या होत्या, पण 2002 मध्ये असा धडा शिकवला गेला की 2002 ते 2022 पर्यंत पुन्हा कुणाची हिंमत झाली नाही. गुजरातमधील जातीय दंगलखोरांविरोधात कठोर पावले उचलून राज्यातील भाजप सरकारांनी गुजरातमध्ये अखंड शांतता प्रस्थापित केली आहे.”
2 वर्षांपूर्वी -
शिंदे है तो मुमकिन है? महाराष्ट्रातील गुजरात सीमेवरील जिल्ह्यांमध्ये गुजरात निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर, आदेश काढले
Gujarat Assembly Election 2022 | गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधींचीही गुजरातच्या प्रचारात सोमवारी एंट्री झाली. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
गुजरात निवडणुकीत भाजपची रणनीती फसतेय, बाहेरच्या उमेदवारांवर अवलंबून राहण्याची वेळ, पक्षातच मोठं बंड उभं राहिलं
Gujarat Assembly Election 2022 | गुजरात निवडणुकीत भाजपला ताकदवान मानलं जात असलं तरी विरोधकांपेक्षा ते पक्षांतर्गत भांडणाने जास्त त्रस्त आहेत. भाजपने मोठ्या प्रमाणावर आमदारांचे तिकीट कापले असून त्यामुळे काही नेते बंडखोर झाले आहेत. मधू श्रीवास्तव यांच्यासारख्या मातब्बर आमदाराने पक्ष बदलला आहे, त्यामुळे भाजपमध्ये विरोधात पाहणारे अनेक नेते उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला नक्कीच स्वत:साठी एक आशा दिसत आहे. साधारणपणे काँग्रेसला अशा बंडाळीला सामोरे जावे लागते असा इतिहास आहे, पण गुजरात भाजपमध्ये हे पहिल्यांदाच उलटं घडत आहे. भाजपात अंतर्गत काही नाही हे दाखवण्याचा पक्षश्रेष्ठी प्रयत्न करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेतून वेळ काढत गुजरातमध्ये प्रचार का करणार? 6 कारणे समोर येतं आहेत
Gujarat Assembly Election 2022 | गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपली रणनीती बदलली आहे. 2017 मध्ये राहुल गांधी यांनी येथे मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. यावेळी ते ‘भारत जोडो यात्रा’ काढत आहेत. राहुल गांधी हिमाचल प्रदेशातही प्रचारापासून दूर राहिले. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, कॉंग्रेस गुजरातच्या ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. काँग्रेसला तिथे चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण ‘आप’च्या वाढत्या पाठिंब्यामुळे पक्षाला आपली निश्चित रणनीती बदलावी लागली.
2 वर्षांपूर्वी -
गुजरात भाजपचे उमेदवार मुलुभाई बेरा यांचा उमेदवारी अर्ज भरताना रिलायन्स ग्रुपच्या डिरेक्टरची उपस्थिती, अनेकांना आश्चर्य
Gujarat Assembly Election 2022 | गुजरातमधील खंभलिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार मुलू बेरा यांनी आपल्या दाव्यासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारी अर्जाला आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार युवजना श्रमिका रायथू आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) कॉर्पोरेट अफेअर्सचे संचालक परिमल नाथवाणी उपस्थित होते. भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी आणि वायएसआर काँग्रेसचे नेते आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
गुजरात निवडणुकीत भाजपला फक्त 50 जागा मिळण्याचा स्थानिक पत्रकारांचा अंदाज, तर भाजप नेत्यांचे रेकॉर्ड तोडण्याचे भाकीत
Gujarat Assembly Election 2022 | पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयी होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजप सर्व रेकॉर्ड तोडून गुजरातमध्ये बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला. सध्या भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे कौतुक करत राज्याचे भवितव्य बदलले आहे, असे म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
अखेर सोनिया गांधी आणि राहुल गुजरात निवडणूक प्रचारात, 15 दिवसांत 25 सभा, भाजपचं टेन्शन वाढलं
Gujarat Assembly Election 2022 | हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आपला संपूर्ण भर मिशन गुजरातवर केंद्रीत केला आहे. याअंतर्गत येत्या 15 दिवसांत पक्षातर्फे एकूण 25 मेगा रॅली काढण्यात येणार असून, त्यात 125 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. काँग्रेसच्या या सभा आक्रमक निवडणूक रणनितीखाली असणार असून, त्यात पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Election 2022 | काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 10 लाख नोकऱ्या, 20 हजाराची शिष्यवृत्ती, 300 युनिट मोफत वीजेचं आश्वासन
Gujarat Election 2022 | गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यात पक्षाने शिक्षण, रोजगार, शेतकरी आणि महिला यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसने तरुणांना १० लाख नोकऱ्या, मुलांसाठी सैनिकी अकादमी, २० हजार रुपये शिष्यवृत्ती आणि दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Assembly Election 2022 | आप पक्ष आज मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार, काँग्रेसही सज्ज
Gujarat Assembly Election 2022 | निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ज्यानंतर आज आप सीएम उमेदवाराचे नावही जाहीर करणार आहेत. या घोषणेपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आदल्या दिवशी आपल्या सर्व नेत्यांसोबत बैठक घेतली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्याची चर्चाही तीव्र झाली आहे. प्रियांका गांधींसोबत राहुल गांधी लवकरच गुजरात दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Assembly Election 2022 | गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 2 टप्प्यात मतदान
Gujarat Assembly Election 2022 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलेलं असून, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुप चंद्र पांडे यानी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाची पोलखोल गुजरात निवडणुक प्रचारात, महाराष्ट्रात भाजपने आमदार विकत घेतल्याचा केजरीवाल यांचा थेट प्रचार सभांमधून आरोप
CM Arvind Kejrival | सध्या राज्यात ‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा सर्वत्र गाजत आहे. राज्यातील सत्तांतरा नंतर ‘गद्दार’ हा शब्द खूपच चर्चेत आला. त्यानंतर झालेल्या राज्याचा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करत सरकारला डिवचलं. त्यानतंर हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गावो गावी आपल्या भाषणात शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करताच उपस्थित जनसमुदाय ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी करू लागतो.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Assembly Election 2022 | राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, काँग्रेसची मोठी व्यहरचना
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत 16 ऑगस्ट रोजी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. १६ ऑगस्ट रोजी विशेष विमानाने ते सकाळी ९:०० वाजता जयपूरहून सुटतील आणि सकाळी १०:३० वाजता सुरतला पोहोचतील. मुख्यमंत्री गेहलोत संध्याकाळी 5:30 वाजता सुरतहून निघतील आणि संध्याकाळी 6:30 वाजता राजकोटला पोहोचतील जिथे ते राजकोट विभागातील नेत्यांची बैठक घेतील आणि रात्री 10:00 वाजता वडोदराला रवाना होतील. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ते वडोदरा विभागातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. मुख्यमंत्री गेहलोत वडोदराहून संध्याकाळी 5:30 वाजता रवाना होतील आणि संध्याकाळी 6:00 वाजता अहमदाबादला पोहोचतील.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन