गुजरातला कोणाची पनवती लागली? मोठा धक्का! महाराष्ट्रातून गुजरातला पळवलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामधून फॉक्सकॉन कंपनी बाहेर पडली
Gujarat Foxconn withdrawn from JV with Vedanta | वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत भाजपचे शिवसेना पक्ष फोडला आणि शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद देऊन पुणे येथे येणारा फॉक्सकॉन-वेदान्ता प्रकल्प गुजरातला पाठवला होता. मात्र आता गुजरात स्वतःच पेचात अडकल्याचं म्हटलं जातंय. कारण देशात चिप्स (सेमीकंडक्टर) बनवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. तैवानची कंपनी फॉक्सकॉनने भारतीय कंपनी वेदांता लिमिटेडसोबतच्या १९.५ अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टर जॉइंट व्हेंचरमधून माघार घेतली आहे. सोमवारी बीएसईवर वेदांताचा शेअर २८२.२५ रुपयांवर बंद झाला.
1 वर्षांपूर्वी