Multibagger Stocks | हा फार्मा स्टॉक देत आहे छप्परफाड परतावा, शेअर्समधील तेजी अजूनही कायम, स्टॉकबद्दल जाणून घ्या
गुजरात फ्लोरोकेमिकल कंपनीचा शेअर प्रति शेअर 9.80 रुपयांच्या वाढीसह शेअर बाजारात 3483.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. निफ्टी मधील या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. गुजरात फ्लोरोकेमिकल कंपनीचा शेअर हा अशा काही स्टॉकपैकी एक आहे ज्याने मागील काही वर्षांत सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना मग ते लहान असो की मोठे, जॅकपॉट परतावा आणि नफा मिळवून दिला आहे. गुंतवणुकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे गुजरात फ्लोरोकेमिकलच्या शेअर्समधील तेजी अजूनही कायम आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरने बीएसई निर्देशांकावर 3449.90 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. बुधवारी म्हणजेच सेन्सेक्समध्येही हा शेअर तेजी दर्शवत होता.
3 वर्षांपूर्वी