महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत २ ग्राम ड्रग्स पकडली तरी माध्यमं हंगामा करतात | गुजरातमध्ये ३ हजार KG ड्रग्स पकडल्यावर मीडिया शांत? - हार्दिक पटेल
गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो हेरॉईन पकडण्यात आली, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडून दिशाभूल | कोरोनामधील अराजकता व अपयशामुळे लोकांमध्ये नाराजी वाढल्याने रुपाणींचा राजीनामा - हार्दिक पटेल
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातच्या विकासाची ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा उत्साह, नवी ऊर्जेसह पुढे जावी. हे लक्षात घेत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं रुपाणी यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
हार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता; पत्नी किंजल पटेल यांचा दावा
गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. १८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना लक्ष्य करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावली, मग उपस्थितांनी हल्लेखोराला चोप दिला
पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या भर प्रचार सभेतील मंचावर श्रीमुखात लगावण्यात आली आहे. गुजरातच्या सुरेंद्र नगरमधील प्रचारसभेदरम्यान, एका अज्ञान व्यक्तीने हार्दिक यांच्या कानाशिलात लगावली. हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधीलकाँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नावं बदलून देश संपन्न होत असेल, तर १२५ कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा
भारतातील महत्वाचे आणि ज्वलंत मुद्यांपासून सामान्यांना विचलित करण्यासाठीच जिल्हे आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव मोदी सरकारकडून सुरू आहे, अशा तिखट शब्दांत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच CBI मधील अंतर्गत वाद, राफेल लढाऊ विमान घोटाळा आणि RBI ची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या आपल्या देशासमोर आहेत. परंतु, केवळ या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून पुढे रेटला जात आहे असं हार्दिक पटेल यांनी सांगितले.
7 वर्षांपूर्वी -
हार्दिक पटेलवर शाईफेक, उज्जैनमधील घटना
पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. सदर घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
गडकरी पंतप्रधान व्हावे हीच संघाची इच्छा, असं कोण म्हणाल ? सविस्तर
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा भारतात कधीच निवडणूक होणार नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत २६ जानेवारी रोजी संविधान बचाव सत्याग्रह.
मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे. हार्दिक पटेल, पवार आणि बडे नेते उपस्थित !
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS