Harish Salve on Hindenburg | हिंडनबर्गवर कायदेशीर कारवाई का करू शकत नाही? वकील हरीश साळवेंची अजब कारण पहा
Harish Salve on Hindenburg | देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी एका मुलाखतीत हिंडनबर्ग अदानी प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. हिंडेनबर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला तरी गौतम अदानी यांचा नातूही हा खटला लढत राहील, असे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, एक काळ होता जेव्हा आपण ब्रिटीश व्यावसायिकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी राजी करत होतो, परंतु आज जगाचे समीकरण बरेच बदलले आहे. हा अहवाल म्हणजे भारतीयांवर हल्ला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विरोधकांबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. साळवे म्हणाले की, गौतम अदानी हे विरोधकांसाठी बळीचा बकरा आहेत असं अजब उत्तर देखील त्यांनी दिलं आहे.
2 वर्षांपूर्वी