महत्वाच्या बातम्या
-
Health first | शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे उपाय। नक्की वाचा
मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून तुमच्या आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरूष आणि स्त्रीयांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवशक्तेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती माहीत असायलाच हवी.
4 वर्षांपूर्वी -
Health first | केसांची समस्या आहे ? वापरा कांद्याचे तेल आणि पहा परिणाम
हिवाळ्यात आपली त्वचा निर्जीव होते, आपले केसही कमकुवत होऊ लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण या हंगामात गरम पाण्याचा जास्त वापर करतो. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर केल्याने तुमचे केस कोरडे व निर्जीव होतात, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती देखील आहे. तसेच केस गळतीची समस्या सुरु होते
4 वर्षांपूर्वी -
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
अतिशय मधुर चवीचे आणि सहज उपलब्ध असणारे असे फळ म्हणजे चिकू. हे फळ शरीराला ताकद देणारे, शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारे, हाडांना बळकटी देणारे, शरीराची चयापचय शक्ती वाढविणारे, असे बहुगुणी आहे. चिकूच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांवर आहारतज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जात असते. चिकूचे झाड जास्तीत जास्त तीस मीटर उंचीपर्यंत वाढू शकत असून, सर्वसाधारणपणे या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटर पर्यंत वाढते. उत्तम देखभाल लाभलेले चिकूचे झाड एका वर्षामध्ये दोन हजार फळे देऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | डाळिंब खाणे आहे आरोग्यासाठी लाभदायक । वाचा सविस्तर
डाळिंब या फळाचे सेवन आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी आहे. तब्येत सुदृढ राहावी, निरोगी राहावी असे वाटत असेल तर दररोज डाळिंब खा. डाळिंब या फळात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोहन (Iron), फॉलिक अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक आहेत. याच कारणामुळे दररोज डाळिंब चावून खाणे लाभदायी आहे. डाळिबांच्या नियमित सेवनाने शरीराला लाभदायी असे पोषक घटक मिळतात. निरोगी राहते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | ब्लूबेरी खा आणि दात किडण्यापासून रोखा । अधिक माहितीसाठी वाचा
दातांची समस्या ही एक खूप साधारण समस्या आहे. भेसळयुक्त अन्न आणि दातांची न घेतलेली निगा यामुळे मोठा त्रास होण्याची शक्यता असते. त्याने आपल्याला खाणे आणि बोलण्यासाठी त्रास होऊ शकतो. परंतु, तुम्ही जर रोजच्या आहारात ब्लुबेरी हे फळ खाल्ले तर दातांच्या जवळपास सर्व समस्यांचं निराकरण त्यातून होऊ शकतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्लुबेरी हे फळ दातासाठी खुप लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्लुबेरी खाण्याचे तीन फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गायीचे शुद्ध सात्विक तूप आहे आरोग्यास हितकारक । नक्की वाचा
आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेलं तूप अनेकांना आवडत नाही. तुपामुळे वजन वाढत असल्याचा अनेकांचा समज आहे. पण जेवणाची चव वाढवण्यासह शुद्ध तूपाचे अनेक फायदे आहेत. एका संशोधनानुसार, गायीचं तूप शरीरात असे काही घटक, तत्व तयार करतं, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पायांत गोळे येत असतील तर करा हे उपाय
पायात पेटके येणे, गोळे येण्याची तक्रार काही जणांकडून वारंवार केली जाते. पायात गोळे येण्याची अनेक कारणे आहेत. पाणी कमी पिणे, पायांना योग्य प्रकारचा व्यायाम न देणे, आहारामध्ये पोषणमूल्यांची तुट असल्याने पायात गोळे येतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ओठांच्या सुंदरतेसाठी करा हे उपाय । नक्की वाचा
आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टीकमध्ये असलेल्या केमीकल्समुळे ओठांवर याचा दुष्परीणाम होवून ओठ काळे पडतात. चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर अवलंबून असते आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्याने हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. त्यामुळे ओठांचे आरोग्य राखण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पनीर खाणे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा
मोठया प्रमाणात लोकांना पनीर आवडतं. त्याचे कारण म्हणजे, भारतीय जेवणात पनीरचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन कमी करायलाही मदत होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खजूर खा आणि आजारांना लांब ठेवा । नक्की वाचा
दिवसात तुम्ही खजूर खातं असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या किवी फळाचे गुणधर्म । सविस्तर वाचा
किवी फळ दिसायला चिकू सारखे दिसते. हे ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण असते. कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. बटाट्याच्या आकाराचं आणि चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच हे फळ डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुप उपयुक्त ठरतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या आणि पहा परिणाम
रोज सकाळी पाणी प्यावे हे घरातले त्याचबरोबर डॉक्टर देखील सांगतात. पण पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मखाना ( कमळ बीज ) खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मखाना म्हणजे कमळ बीज. हे एक मधुर आणि पौष्टिक खाद्य आहे. फॉक्स नट, फूल-मखाना, लोटस सीड आणि गॉर्गन नट अशा नावांनी हे ओळखले जाते. याचे बियाणे भाजून घेतल्यानंतर अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त हे अनेक प्रकारच्या पोषक घटकांनी समृद्ध आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गरम पाणी पिणे आहे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा
पाणी म्हणजे जीवन. मनुष्य पाणी न पिता राहू शकणार नाही. पाणी सेवनाचे अनेक फायदे शरीराला मिळत असतात त्यातील मुख्य म्हणजे आपले शरीर ओलसर राहते आणि त्वचा नरम राहते. तहान लागली कि आपण पाणी पितो तसेच खाल्ल्यानंतरहि पाणी आवश्यक असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुळशीची पाने दुधातून घेणे आहे आरोग्यासाठी लाभदायक। नक्की वाचा
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स । अधिक माहितीसाठी वाचा
मुंबई ५ एप्रिल : पहिला दात येणापुर्वीच त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर एखाद्या स्वच्छ कापडाने त्याच्या हिरड्या पुसुन घ्याव्यात. हिरड्यांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते. दातांची काळजी कशी घ्यावी : माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमीत दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ […]
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात त्वचा ठेवा अधिक मुलायम आणि तजेलदार । अधिक माहितीसाठी वाचा
आपल्या त्वचेच्या गरजा ऋतुनुसार बदलत राहतात. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते तर उन्हाळ्यामध्ये त्वचा डिहायड्रेट होऊ लागते. त्वचेचे नुकसान होऊ नये, यासाठी वेळोवेळी देखभाल करणं अतिशय आवश्यक आहे. ऋतुनुसार आपल्या सवयीत बदल घडवल्यास त्वचेला त्रास होणार नाही. त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो, तेव्हा चेहरा मऊ आणि नितळ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात. ज्या प्रमाणे उन्हाळ्यामध्ये १० ते १२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, त्याच प्रमाणे त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. कडक ऊन, गरम हवा आणि धूळ-मातीमुळे चेहऱ्याच्या त्वचेवर गंभीर दुष्परिणाम होतात. अशावेळी त्वचेला काळजी आणि पोषणाची आवश्यकता असते. उन्हाळ्यात त्वचा डिहायड्रेट होऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कच्चा कांदा खाल्याने होणारे फायदे। अधिक माहितीसाठी वाचा
स्वयंपाकघरातला कांदा आरोग्यासाठी तसंच सौंदर्यासाठी खजिना असल्याचं मानलं जातं. जेवणात नेहमीच कांद्याचा वापर केला जातो. पण जेवणात शिजवलेला कांदा खाण्याहून कच्चा कांदा खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. कच्च्या कांद्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होऊ शकतो. जाणून घ्या काय आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे
4 वर्षांपूर्वी -
Health First | रक्तदाब कमी झाल्यास काय कराल । अधिक माहितीसाठी वाचा
केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास धोकादायक असतो असे नाही. लो बीपीदेखील आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे धावपळीच्या आणि तणावग्रस्त होत चाललेल्या आजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हांला लो बीपीचा त्रास असल्यास त्याकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आजारांवर मात करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवा । नक्की वाचा
कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक जोरदार वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. पण आपण देखील या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणं तितकचं गरजेच आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय नक्की वाचा. पण आहारात या पदार्थंचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या…
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC