महत्वाच्या बातम्या
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गर्मी पासून बचाव करण्यासाठी कलिंगड खा | अधिक माहितीसाठी वाचा
उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही-लाही होते, अशा वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. आपल्याकडे हंगामी फळे भाज्या येतात. सध्या उन्हाळा चालू आहे आणि हा हंगाम आहे कलिंगडाचा. बाजारात तुम्हाला लाल, रसदार कलिंगड पाहायला मिळतील. उन्हाळ्यात कलिंगडचा आहारात समावेश करा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा
केळे हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारं फळ आहे. केळी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात. केळ्यामध्ये 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळे खाणे उपयोगी ठरते. पोटॅशियम, मँगनीज, लोह, फॉलिक अॅसिड, फायबर्स, स्टार्च व सेल्युलोज अशी कर्बोदके, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, अल्फा कॅरॉटिन व बीटा कॅरॉटिन ही कॅरॉटिनाइड फायटोकेमिकल्स यासारखी आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषकघटक केळ्यात मोठ्या प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनापासून वाचण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन नक्की करा
कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतत हात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुरक आहार घेणं तितकचं महत्तवाचं आहे. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतीकारशक्ती कमी आहे त्यांना कोरोना लवकर बळावण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, जीवनसत्त्वे सी, डी आणि बरेच सूक्ष्म पोषक घटक आहेत जे आपले कोरोनापासून संरक्षण करू शकतात. त्यामुळे या परिस्थित योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | Immunity स्ट्रॉग आहे की नाही | लक्षणे जाणून घ्या
कोरोना महामारी काळात ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधलं ते म्हणजे इम्यूनिटी अर्थात रोग प्रतिकारक शक्ती. आमची इम्यूनिटी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस सारख्या टॉक्सिन्सला लढा देते आणि आम्हाला सर्दी, खोकला सारख्या व्हायरल संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते. आमची इम्यूनिटी स्ट्रॉग असल्यास लंग्स, किडनी आणि लिव्हर संक्रमण तसेच इतर आजरांपासून बचाव होतो.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस
महाराष्ट्रात कोराेनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात २८ मार्चला ४०,४१४ रुग्ण आढळले होते. यानंतर ३१ मार्चला ३९,५४४ रुग्ण वाढले. गुरुवारी हा आकडा वाढून पुन्हा ४३,१८३ झाला. महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वय वर्ष ४५ पेक्षा अधिक | आजपासून कोरोना लसीकरण | हे आहेत तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं
देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते.
4 वर्षांपूर्वी -
फायजरची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी 100% परिणामकारक | कंपनीचा दावा
कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने दावा केला आहे की, त्यांची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांवर 100% परिणामकारक आहे. CNN ने सांगितल्यानुसार, कंपनीने बुधवारी म्हटले की, अमेरिकेत 2,250 मुलांवर झालेल्या फेज थ्री ट्रायल्समध्हे ही लस 100% परिणामकारस असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात चांगला अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सीजन आलाय | पण काय आहेत आंब्याचे फायदे आणि तोटे
सध्या बाजारात सर्वत्र आंबे दिसतात. आंबा सर्वांनच्याच आवडीचा फळ आहे. उन्हाळा आणि आंबा हे तर समिकरण तयार झालं आहे. आंबा हे फळ आपण अत्यंत आवडीने खातो. पण आंब्याचे शरीरावर होणारे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का?
4 वर्षांपूर्वी -
एकाच व्यक्तीचे एकाच लॅबमध्ये दोन दिवसात दोन भिन्न रिपोर्ट | लॅब्स टेन्शन वाढवत आहेत?
एकाबाजूला मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णवाढीचा येथे उद्रेक होत आहे. आणि त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, आणि अंधेरी पूर्व अशी ही 5 महत्वाची, अतिसंसर्गाची आणि पटापट रुग्णवाढीची ही ठिकाण आहेत. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण या प्रभागात वाढले आहेत. याचाच अर्थ असा की, सगळ्यात जास्त लागण याचं पाच प्रभागात होते. त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे वाचल्यावर समजतील फायदे | केळ्यावर असे डाग आले म्हणून फेकणार नाही
साधारणपणे केळ्यावर असे डाग दिसले तर लोक त्यास खराब समजून फेकून देण्याची चूक करतात. वास्तविक ही केळी खराब नव्हे तर पूर्णपणे पिकलेली असतात म्हणून त्याला डाग दिसतात. ज्या केळ्यावर हे काळे डाग दिसतात ती खरेतर इतर केळ्यांपेक्षा अधिक पौष्टिक असतात. चला तर पाहूया अशी केळी खाल्ल्याचे फायदे काय काय असतात ते:
4 वर्षांपूर्वी -
Health First | सब्जा बिया खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे
तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरियंट (प्रकार) सापडल्याचे सांगितले. १८ राज्यांत कोरोनाच्या ३ व्हेरियंटचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. त्यात ७३६ रुग्ण यूके व्हेरियंट, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि १ रुग्ण ब्राझिलियन व्हेरियंटचा आहे. हे प्रकार अनेक राज्यांतील १०,७८७ पॉझिटिव्ह नमुन्यांच्या तपासणीत आढळले.
4 वर्षांपूर्वी -
शहाणपण सुचलं? | कोविशील्ड व्हॅक्सिनचा इतर देशांना पुरवठा बंद | देशांतर्गत लसीकरणावर जोर
देशात मागील २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील पाच महिन्यात ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यासोबतच भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सतत ढेकर येणे, पोटात गॅस होणे | जाणून घ्या घरगुती रामबाण उपाय
सारख्या ढेकर येत असल्यास अस्वस्थ वाटू शकते, काही घरगुती उपायांनी हा त्रास कमी होईल. जेव्हा तुम्ही अनेक लोकांमध्ये असता आणि अचानक तुम्हाला शिंक अथवा ढेकर असल्यास खूप ऑक्वर्ड वाटत राहाते. काही लोकांना नेहमीच असे होते. विशेषतः काहीलोकांना थोड्या थोड्या वेळाने ढेकरा येत राहातात. याची अनेक कारणे आहेत. पोट बिघडलेले असणे आणि गैस ही ह्याची महत्वाची कारणे आहेत. काही घरगुती उपायांनी तुम्ही यापासून मुक्ती मिळवू शकता. या सगळ्या गोष्टी सहजपणे तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात ज्या तुम्हाला या समस्येपासून सुटका करण्यात मदत करतील.
4 वर्षांपूर्वी -
Covid 19 Updates | देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील | देशातही रुग्ण वाढ सुरु
महाराष्ट्र आणि गुजरातमधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत चालली आहे. देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
तुमचं वय ४५ वर्षांपेक्षा अधिक आहे? | मग १ एप्रिलपासून लस मिळणार
देशात कोरोना संक्रमनामुळे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज देशात नवीन रुग्णांची संख्या ही 40,611 आढळली असून यात 29,735 उपचार घेत बरे झाले आहेत. तर 197 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी देशामध्ये 47,009 नवीन रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठवड्यामध्ये पहिल्यांदा नवीन रुग्णांच्या संख्येत एवढी घट पाहायला मिळाली आहे. यापूर्वी 14 मार्चला 26,413 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यामध्ये सतत वाढ होत गेली.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्यदायी हिरवी मूग ‘या’ आजारांचा धोका करतात कमी
आपलले शरीर चांगले राहावे यासाठी मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्व असणाऱ्या हिरव्या मूग डाळचा आपल्या आहारात वापर करावा. हिरवी मूग डाळ ही आपले वजन कमी करण्यापासून मधुमेहापर्यंतच्या अनेक रोगांचा धोका कमी करते. वजन वाढीमुळे अनेक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते. निरोगी राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोवीशील्ड व्हॅक्सीन | आता 4 ऐवजी 8 आठवड्यानंतर दुसरा डोस | नवीन गाइडलाइन
सरकारने अॅस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील वेळेला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार, कोवीशील्डच्या दोन डोसमध्ये आता कमीत-कमी 6 ते 8 आठवड्यांचे अंतर ठेवले जाईल. सध्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर आहे. दरम्यान, हा निर्णय कोव्हॅक्सिनवर लागू होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दातांमध्ये फट असणाऱ्या लोकांमध्ये असतात हे सकारात्मक गुण | नक्की वाचा
आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचे, तसेच व्यक्तीच्या स्वभावाचे, अगदी त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत, त्याचे चारित्र्य आणि त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटना, आणि त्याचे वर्तमान याबद्दल अंदाज केला जाऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा