महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत कोरोना लस कुठे मिळणार? | वाचा २९ खासगी रुग्णालयांची यादी
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईसाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही २९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Beauty Tips | उन्हाळ्यात अशी ठेवा त्वचा तजेलदार
कडक उन्हाळ्यात त्वचेला प्रचंड घाम, घामामुळे त्वेचवर उठणारे पुरळ यामुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. सतत उन्हात फिरल्यामुळे त्वचा काळवंडते देखील. अनेकजण सौंदर्यप्रसाधनं वापरून त्वचेवर विविध उपय करतात पण यापेक्षा काही घरघुती उपायांनी आपण त्वचेला तजेलदार बनवू शकतो. त्यासाठी आपण जाणून घेऊया खास घरगुती उपाय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाढ झोप लागण्यासाठी करा हे उपाय
आपल्या रोजच्या धावपळीत, घाईगडबडीत आपल्याला सर्वाधिक ताजेतवाने ठेवण्यात कशाची सर्वाधिक मदत होत असेल तर झोपेची. दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर गाढ झोप लागली तरच दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटते आणि कामाचा उत्साह संचारतो. पण जर रात्री झोप नीट लागलीच नाही, तर दुसऱ्या दिवशी कोणत्याच कामात उत्साह जाणवत नाही. यामुळेच झोपेच महत्त्व रोजच्या दिनक्रमात अनन्यसाधारण आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल? | सविस्तर माहिती
प्रत्येकाला कोरोनावरची लस मिळावी यासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेतील नोंदणीसाठी को-विन हे ॲप विकसित केले आहे. प्ले स्टोअरवर असलेले हे ॲप केवळ ॲडमिनिस्ट्रेटर्ससाठीच उपलब्ध असून लसीकरणासाठी नोंदणी आणि आरक्षण केवळ पोर्टलद्वारेच करता येणार आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन वाढवायचे असल्यास केळी आवर्जून खा
आपलं वाढतं वजन ही जशी स्थूल व्यक्तींची समस्या आहे तसेच न वाढणारं वजन की कृश व्यक्तींची समस्या आहे. वजन वाढत नाही म्हणून अनेकजण प्रोटीन्स, गोळ्या, पावडरचं सेवन करून वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. यानं चटकन परिणाम दिसून येतो, मात्र यासर्वांचे दृष्परिणामही तितकेच आहे. त्यामुळे तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर केळी ही उत्तम पर्याय आहे.
4 वर्षांपूर्वी -
Success Mantra | सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करा | अडचणीतून मार्ग निघतात
अत्यंत अडचणींचा, कठीण परिस्थितीचा सामना आयुष्यात प्रत्येकालाच करावा लागतो. यातून तरून पुढे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे सकारात्मक विचार करण्याची वृत्ती. तुम्ही किती सकारात्मकपणे परिस्थितीकडे बघता, यावर तुमचा जीवन दृष्टिकोन अवलंबून असतो. ज्या व्यक्ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे, वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या बदलांकडे सकारात्मकपणे बघतात. त्या नक्कीच यशस्वी होतात. आपल्या आयुष्यात जे काही घडेल, ते चांगलेच असेल, असा विचार करून पुढे जात राहणे माणसाला आनंदी तर ठेवतेच पण त्याची वाटचाल इतरांसाठीही प्रेरणादायक ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Beauty Tips | नारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार
कडक उन्हामुळे अनेकांच्या त्वचेवर पुरळ उठतं, घामोळ्या येतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज व काळवंडते. आपण यासाठी विविध उपाय करून पाहतो. याकाळात त्वचेची आतून तसेच बाहेरून काळजी घेणं आवश्यक आहे ती कशी घ्यायची ते पाहू.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी ही पेय नक्की प्या
कडक उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो, तहान लागते अशावेळी अनेकजण कोल्डड्रिंक्सकडे वळतात. मात्र काही शीतपेय ही शरीरास हानिकारक असतात अशावेळी आपण आरोग्यास फायदेशीर असंच पेयपान केलं पाहिजे. यामुळे तहानही भागते पण त्याचबरोबर ही पेय शरीरास फायदेशीर देखील असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मीठ टाकून कलिंगड का खाऊ नये? | नक्की वाचा
कडक उन्हाळ्याच्या मौसमात येणारं कलिंगड हे आवर्जून खाण्यासारखं फळ आहे. मात्र काहीजण भरपूर प्रमाणात चाट मसाला किंवा मीठ टाकून हे फळ खातात. मात्र अशाप्रकारे कलिंगडाचं सेवन करणं पूर्णपणे चुकीचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | म्हणून उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे
कडक उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते. अशावेळी लालबूंद गर असलेली कलिंगड ठिकठिकाणी आपल्याला दिसतात. ही कलिंगड उन्हापासून आपल्या शरीराची होणारी लाही लाही रोखण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. एसी, पंखा, कूलर हे आपल्या शरीराला बाहेरून काही काळापुरता थंडावा पोहोचवत असले तरी कलिंगड हे शरीराला आतून थंड करणारं नैसर्गिक कुलर असल्याचं म्हणता येईल. म्हणूनच उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | म्हणून अक्रोड कवचासहच खरेदी करावा
पौष्टिक अक्रोडास सुक्यामेव्यात महत्वाचं स्थान असते. केक किंवा अन्य पदार्थांमध्ये अक्रोड वापरले जातात. अक्रोड हे कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्व , प्रथिने, तंतूमय व पिष्टमय पदार्थांचा खजिना आहे. मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड फायदेशीर आहे म्हणूनच बदाम, पिस्त्यासोबत अक्रोडचंही सेवन करतात. हल्ली बाजारात अक्रोडचा गर मिळतो, अक्रोडचं कवच अत्यंत टणक असतं म्हणूनच कवच फोडून त्यातील गर विक्रीसाठी असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पपई खा आणि वजन घटवा
ऋतू कोणताही असो पण आपली प्रकृती ही धडधाकट राहायला पाहिजे. सध्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकजण वाढत्या वजनानं त्रस्त आहेत. या समस्येवर पपई हे फळ जास्त फायदेशीर ठरू शकतं. पपई रक्त शुद्ध करते पण त्वचा आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासही ती फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळा आला | फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे
कडक उन्हाळ्यात बाहेरून काटेरी पण आतून मधुर असणारे फणस सहज दिसतात. खासकरून कोकणातून हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. कोकणाबरोबरच बंगळुरू, गोव्यातही फणसाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. फणसामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे पण त्याचबरोबर फणसात प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | झोपे, अपचन सारख्या समस्यांवर जायफळ फायदेशीर
जायफळ ही भारतीय मसाल्यांमध्ये प्रामुख्यानं वापरली जाते. जायफळीत अँटी ऑक्सिडंट, रोग प्रतिकारक शक्ती अधिक आहे. जायफळ ही प्रामुख्याने आतड्यांच्या व पचनाच्या विकारांवर फायदेशीर आहे. ज्यांना झोपेची समस्या आहे अशांनी जायफळ दुधात टाकून रात्री प्यावं यामुळे चांगली झोप लागते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दह्याचा आहारात समावेश असावा | वाचा फायदे
आहारात दह्याचा आवर्जुन सहभाग करावा, असं आयुर्वेदातही सांगितलं आहे. दह्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, रिबोफ्लेविन, लोह व कॅल्शिअम ही नैसर्गिक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. दह्यात असणारे लॅक्टोबॅसिल्स हे आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पचनास उपयुक्त अशा बॅक्टेरियांची निर्मिती करतात. त्याचप्रमाणे दह्यात असलेले कॅल्शिअम हे हाडांसाठी मजबुत असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोमट पाण्यासोबत काळी मिरी खाण्याचे हे आहेत फायदे
काळी मिरी हा मसाल्यामध्ये वापरला जाणारा प्रमुख जिन्नस होय. पूर्वी काळी मिरीला युरोपीय बाजारात सोन्याइतकाच भाव होता याचे दाखले आपण इतिहासात वाचतो. केवळ अन्नपदार्थांची चवच नाही तर अनेक औषधी गुणधर्मही काळी मिरीत आहेत. काळ्या मिरीचे व्यापारी हे त्यावेळी सर्वात श्रीमंत व्यापारांपैकी एक म्हणून गणले जायचे. चला तर मग जाणून घेऊ काळ्या मिरीची फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दिवसांतून २ अंड्यांपेक्षा जास्त अंडी खाणं आरोग्यास घातक
आहारात अंड्यांचा समावेश करावा असं आवर्जून सांगितलं जातं. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा नेहमीच आरोग्यासाठी घातक असतो. दिवसांतून दोन अंड्यांपेक्षाही अधिक अंडी खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक असतं असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे लवकर मृत्यू होणं किंवा हृदय विकार संबधीत समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जंक फूडमुळे मुलांना अॅलर्जीचा धोका अधिक
हल्लीच्या मुलांना पौष्टिक आहारापेक्षाही जंक फूडची आवड अधिक असते. फळे, भाज्या, दूध यांनी परिपूर्ण आहार खायला मुलं नकार देतात. बहुतेक मुलं ही जंक फूडच्या आहारी जात चालली आहेत. सकस आहार घेण्यापेक्षा जंक फूडचा आहारात समावेश करण्याचं प्रमाण हे अधिक वाढलं आहे. जंक फूड हे आरोग्यास अत्यंत धोकादायक असल्याचं यापूर्वीही पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. मात्र असं असलं तरी लहान मुलांची जंक फूडच्या आहारी जाण्याची सवय अद्यापही सुटली नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अॅसिडिटीच्या त्रासावर सब्जा फायदेशीर
तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे पाच पदार्थ तुमचा उदास मूड करतील ठिक
खाणं आणि मन यांचा संबंध तसा खूप जवळचा. आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परिणाम होत असतो हे आपल्याला मान्य करायलाच हवं. त्यातून काही पदार्थ असे असतात ज्यामुळे तुम्हाला झटपट उर्जा मिळते आणि तुमचा उदास, कंटाळवाणा मूड एका फटक्यात ठिक होतो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या