Hilton Metal Forging Share Price | 8 रुपयाचा हिल्टन मेटल फोर्जिंग शेअर, मागील 3 वर्षांत 1600 टक्के परतावा दिला, आजही होतेय खरेदी
Hilton Metal Forging Share Price | ‘हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांत, ‘हिल्टन मेटल फोर्जिंग्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1600 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 22 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 मे 2023 रोजी हा स्टॉक 155.95 रुपये किमतीवर पोहचला होता. ज्या लोकांनी तीन वर्षापुर्वी हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 लाखपेक्षा अधिक झाले आहे. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीचे शेअर्स 0.032 टक्के वाढीसह 157.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी