हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेत येताच फायद्याची जुनी पेन्शन योजना लागू, तर महिलांना महिना रु. 1500, कर्मचारी व महिलांचा रस्त्यावर जल्लोष
OPS Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पूर्ववत करण्यात आली आहे. काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत याला मंजुरी दिली. ओपीएसच्या जीर्णोद्धाराची घोषणा करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पाचवे राज्य ठरले आहे. हिमाचल निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी ओपीएसची पुनर्स्थापना ही होती. काँग्रेसने सरकार स्थापन होताच ओपीएस पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने आज राज्यात दिलेले आश्वासन पूर्ण केले. ओपीएस पूर्ववत झाल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचं चित्र असून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी हिमाचल सचिवालयासमोर जोरदार डान्स केला.
2 वर्षांपूर्वी