Himadri Speciality Chemical Share Price | संयमाचे फळ! हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरने 1 लाख गुंतवणुकीवर दिला 3.19 कोटी रुपये परतावा दिला
Himadri Speciality Chemical Share Price | हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड या भारतातील टॉप स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा व्यापारी करार केला असल्याची बातमी आली आहे. हिमाद्री स्पेशॅलिटी कंपनीने ऑस्ट्रेलियन कंपनी सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याची चर्चा होत आहे. हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीने सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीचे 12.79 टक्के भाग भांडवल 10.32 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले आहेत. सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीसाठी लागणाऱ्या उच्च क्षमतेच्या सिलिकॉन एनोड तंत्रज्ञानामध्ये एक्स्पर्ट मानली जाते. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 127.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी