आगामी निवडणुकांना धार्मिक वळण? | 2023 मध्ये साधू-संत 'हिंदू राष्ट्र' नावाने राज्यघटना आणणार, मुस्लिम, ख्रिश्चनांना मतदानाचा हक्क नसेल
संत आणि महंतांचा एक गट ‘स्वतःची भारतीय राज्यघटना म्हणजे हिंदू राष्ट्र’ या नावाने एक मसुदा तयार करत आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे माघ मेळा २०२३ दरम्यान होणाऱ्या ‘धर्म संसद’मध्ये याची ओळख करून दिली जाणार आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या माघ मेळ्याच्या वेळी धर्मसंसदेत भारताला स्वत:च्या संविधानाने ‘हिंदुराष्ट्र’ करण्याचा ठराव संमत करण्यात आला. आता शांभवी पीठाधिश्वर यांच्या आश्रयाने ३० जणांच्या गटाकडून या ‘संविधाना’चा मसुदा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती वाराणसीस्थित शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी दिली.
2 वर्षांपूर्वी