Homemade Scrub For Face | साखरेने चेहरा होईल चमकदार व निरोगी, घरीच करा शुगर स्क्रब, या टिप्स फॉलो करा
Homemade Scrub For Face | आपली त्वचा सुंदर व चमकदार दिसण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. तसेच स्क्रबचा देखील पर्याय निवडतात पण त्याचे आपल्या त्वचेला तोटे सुद्धा होतात तर आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने कसे स्क्रब बनवायचे ते सांगणार आहे. स्क्रबिंगमुळे त्वचेवरील धूळ, घाण, तेल, घाम निघून जातो आणि त्वचा स्वच्छ दिसायला लागते. तसेच स्क्रब केल्याने चेहरा चमकदार दिसू लागतो. स्क्रबमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग घटक त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतात, आणि ज्यामुळे त्वचेला चमक येते, स्क्रबिंग केल्याने चेहऱ्यावर वाढत्या वयाचा प्रभाव कमी दिसतो आणि तुमचे वय दिसून येत नाही. आठवड्यातून एकदा स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ व निरोगी राहते. स्क्रबिंगसाठी केमिकल बेस उत्पादने वापरण्याऐवजी, घरगुती वस्तूंपासून बनलेले उत्पादन अधिक प्रभावी ठरते तसेच घरगुती स्क्रबने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होण्याचा धोका नाहीये तसेच शुगर स्क्रब हा चेहरा स्क्रब करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे जो सर्व प्रकारच्या त्वचेला शोभून दिसतो आणि जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असेल तर तुम्ही शुगर स्क्रब वापरू शकता. घरीच साखरेचा स्क्रब कसा तयार करायचा ते जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी