Service Charge | अजब मोदी सरकार | हॉटेल्स बिलातील सेवाशुल्काच्या विरोधात | पण दर वाढवण्याची दुसरी युक्तीही दिली
केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, रेस्टॉरंट्स अन्न बिलात सेवा शुल्क जोडू शकत नाहीत. मात्र, ग्राहकांना हवे असल्यास ते स्वत:च्या मर्जीने हॉटेलमध्ये वेगळी टीप देऊ शकतात. जर रेस्टॉरंट मालकाला आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त पगार द्यायचा असेल तर देशात किंमतीवर नियंत्रण नसल्याने ते जेवणाच्या मेन्यू कार्डमधील दर वाढवू शकतात, असं गोयल यांनी सांगितलं. सेवा शुल्क काढून टाकल्यानंतर त्यांचे नुकसान होईल, हा रेस्टॉरंट मालकांचा युक्तिवाद त्यांनी फेटाळून लावला.
3 वर्षांपूर्वी