Hrithik Roshan | रितिक रोशनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा 'हा' व्हिडिओ होत आहे वायरल - Marathi News
Hrithik Roshan | बॉलीवूड ॲक्टर रितिक रोशन हा सध्या त्याच्या ‘वॉर 2’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचा पाहायला मिळतोय. 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटामधून रितिकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रितिक रोशन आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे दोन धडाकेबाज कलाकार पहिल्यांदाच एकत्रित झळकले होते. दरम्यान वॉरच्या सिक्वलचा म्हणजेच वॉर 2 च्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये पाहूया.
4 महिन्यांपूर्वी