IIFL Mutual Fund | IIFL म्युच्युअल फंडाने नवीन फंड लाँच केला, 21 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीची संधी, स्कीमचे फायदे वाचा
IIFL Mutual Fund | IIFL म्युच्युअल फंड कंपनीला भारतातील पहिला टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड म्हणजे IIFL ELSS निफ्टी-50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड सुरू करण्याचा मान जातो. या नवीन फंडमध्ये 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे. ही म्युचुअल फंड योजना एक ओपन-एंडेड पॅसिव्ह इक्विटी लिंक्ड बचत योजना आहे. गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक केल्यास कर लाभांसह प्रचंड मोठा परतावा कमावण्याची संधी मिळेल. या न्यू फंड ऑफर मध्ये गुंतवणूक करण्याची मुदत 1 डिसेंबर 2022 ते 21 डिसेंबर 2022 पर्यंत असेल. इतर सक्रिय म्युचुअल फंड योजनेच्या तुलनेत हा न्यू फंड ऑफरचे खर्चाचे प्रमाण खूप कमी आहे. IIFL ELSS निफ्टी-50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड ही स्कीम 2 जानेवारी 2023 पासून गुंतवणूक आणि पूर्ततेसाठी पुन्हा खुली केली जाईल. पारिजात गर्ग यांनी IIFL ELSS निफ्टी-50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंडाचे समर्पित निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी