IKIO Lighting IPO GMP Today | IKIO लायटिंग कंपनीचा IPO सूचीबद्ध होण्यास सज्ज, शेअरची ग्रे मार्केट किंमत तेजीत वाढत आहे
IKIO Lighting IPO GMP Today | IKIO लायटिंग कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO 3 दिवस गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. याकाळात हा IPO 75 पट सबस्क्राइब झाला होता. IPO च्या शेवटच्या दिवशी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 163 पट सबस्क्राईब झाला होता. ज्या गुंतवणूकदारांनी IKIO लायटिंग कंपनीच्या IKIO लायटिंग कंपनीच्या IPO स्टॉकवर पैसे लावले होते, ते आता शेअर वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IKIO लायटिंग कंपनी 13 जून 2023 रोजी गुंतवणुकदारांना शेअर्सचे वाटप करेल.
2 वर्षांपूर्वी