India Cements Share Price | या सिमेंट कंपनीचे शेअर्स 40 टक्के स्वस्त होऊ शकतात, स्टॉक स्वस्तात खरेदी करावा? तज्ञ काय म्हणाले?
India Cements Share Price | सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘इंडिया सिमेंट्स’ च्या शेअर्समधील विक्रीचा दबाव काही थांबायचे नाव घेत नाही. अवघ्या पाच महिन्यात या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेअर मध्ये किमान 40 टक्क्यांची घसरण होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, ज्यामुळे ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने इंडिया सिमेंट कंपनीच्या शेअरवर ‘sell’ रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 112 रुपये लक्ष किंमत दिली आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 188.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, India Cements Share Price | India Cements Stock Price | BSE 530005 | NSE INDIACEM)
2 वर्षांपूर्वी