INDIA Vs NDA | विरोधकांच्या आघाडीला 'UPA'च म्हणा तर कधी 'घमंडिया' म्हणण्याचा सल्ला! मोदींनी 'इंडिया' आघाडीची धास्ती घेतल्याची चर्चा
INDIA Vs NDA 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बैठका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमध्ये युतीच्या घटक पक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नव्या विरोधी आघाडी ‘इंडिया’ वरही निशाणा साधत हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदीयांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए पक्षांच्या खासदारांची वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये विभागणी केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपासून या सर्वांची बैठक सुरू आहे.
1 वर्षांपूर्वी