महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप? काँग्रेसचे व जेडीएस'चे ११ आमदार फुटणार
कर्नाटकात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण काँग्रेसचे एकूण ८ तर जेडीएसचे ३ असे मिळून तब्बल ११ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. एकूण संख्याबळानुसार जर १२ आमदारांनी राजीनामे सोपवले तर विद्यमान सरकार अल्पमतात येऊ शकते. मागील वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली, तेव्हा पासून कर्नाटकातील भाजपचे धुरंदर सरकार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते, मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर या हालचालींनी पुन्हा जोर धरला होता.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून ३३ ठार तर २२ जखमी
जम्मू काश्मरीच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झालं आहे ज्यामध्ये तब्बल ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर एकूण २२ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! देशात २०३० पर्यंत पाणी संपुष्टात येण्याच्या मार्गावर: नीती आयोगाचा रिपोर्ट
देशातील अनेक शहरांमध्ये सध्या दुष्काळामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान आगामी काळात हे संकट अधीकच भयानक होण्याची शक्यता केंद्रीय नीती आयोगाच्या एका अहवालात समोर आली असून त्यानुसार देशात २०३० पर्यंत पाणी संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं सांगितले आहे. तसेच पाणीटंचाईची सर्वात भीषण समस्या ही दिल्ली, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांना देखील करावी लागणार आहे. २०२० पासून पाणीटंचाईची तीव्रता वाढेल म्हणजे आगामी काळात तब्बल १० कोटी लोकांवर पाणी संकट येईल.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, ६६ मुलांचा मृत्यू
बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने मोठं थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या भयंकर आजाराने आतापर्यंत तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने बिहारमध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. एसकेएससीएच या इस्पितळात ५५ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल इस्पितळामध्ये ११ मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयातील २ डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांकडून शुक्रवारी (१४ जून) राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यादरम्यान राज्यातील रुग्णालयांतील आपत्कालीन रुग्णसेवा सुरू असेल.
6 वर्षांपूर्वी -
अंतराळस्थानक निर्मितीची भारताची योजना : इस्रो
भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यात देखील आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वृत्त आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशाला हादरवणाऱ्या कठुआ बलात्कारप्रकरणी सातपैकी सहाजण दोषी
जम्मू-काश्मीरमधील बहुचर्चित कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी पठाणकोट कोर्टाने प्रमुख आरोपी सांझी राम, तिलक दत्ता यांच्यासह ५ जणांना दोषी ठरवले आहे. तर, आरोपी विशाल याला दोषमुक्त करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने आज आपला निकाल सुनावला. २ वाजता सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता, या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड कालवश
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं सोमवारी सकाळी बंगळुरू येथील त्यांंच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. १९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला होता. मराठी, हिंदी आणि कन्नड भाषांवर त्यांचे प्रभत्व होते. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे त्यांचं मूळ गाव. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार सो रहा हैं! चीनच्या दोन बोटी परवानगी नसताना दाभोळ खाडीत
भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याचा अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अरबी समुद्रच्या मार्गे कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटी आढळून आल्या आहेत. संबंधित बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचं वृत्त आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. परंतु या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल ९००० कोटींचे नुकसान
ओडिशात फनी या चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान या चक्रीवादळात आतापर्यंत एकूण ६४ पेक्षा अधिक सामान्य स्थानिक नागरिकांचा जीव गेल्याचे वृत्त आहे. ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून आजूबाजूच्या घरांची मोठी हानी झाली होती. घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली गेला होता. मोठ्या प्रमाणात ओडिशाचे नुकसान झाले. फनी या चक्रीवादळामुळे तब्बल ९३३६ कोटी एवढं प्रचंड नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गात गडगडाटासह पावसाची हजेरी! वीज, टेलिफोन सेवा खंडित
कोकणाची आज पहाट झाली ती जोरदार पावसाने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या हजेरीने सुखावलेल्या बळीराजाने पेरणीची कामेदेखील सुरू केली आहेत. परंतु पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणची वीज आणि टेलिफोन सेवा खंडित झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल, विदर्भ-मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बसपा उत्तर प्रदेश पोटनिवडणुका स्वबळावर लढवणार
लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयासह बहुमताने मोदींचे भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत आले. मात्र देशातील सर्वच विरोधी पक्ष आता त्यांच्या जुन्या रणनीतीत बदल करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी मायावतींच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं, मतदान प्रक्रिया खंडित
देशात लोकसभेच्या ५व्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. बिहारमध्ये ५व्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. सारण लोकसभा मतदारसंघात हा धाकायदायक प्रकार घडला आहे. हाती माहितीनुसार, सारण लोकसभा निवडणुकींतर्गत सोनपूर विधानसभेच्या नयागावातील १३१ नंबर मतदान केंद्रावर ही ईव्हीएम मशिन फोडल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती. या प्रकरणी रणजित पासवान याला अटक करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘फनी’ चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यावर थडकलं! लाखोंचे स्थलांतर
सर्वाधिक घातक असे ‘फनी’ चक्रीवादळ आज सकाळी नऊच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने ‘फनी’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून अकरा नंतर फनीचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ओडिशासह आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज आहे. गृहमंत्रालयाकडून १९३८ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. पुरी आणि भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा दावा नेपाळ सैन्यानं फेटाळला, ती पावलं हिममानवाची नव्हे, तर जंगली अस्वलाची
लोक कथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
6 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
भारतातील अनेक महत्वाच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच कुख्यात दहशदवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील १४ मतदारसंघांसह देशात ११७ जागांवर काटे की टक्कर होणार
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भारतीय जनता पक्षाची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.
6 वर्षांपूर्वी -
जेट एअरवेज आणि एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने जेट एअरवेज आणि एअर इंडिया या २ बड्या नागरी विमान वाहतूक कंपन्या स्वतःच्या ताब्यात घेण्यात रस दाखविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज बुधवारी बंद पडली असून, सरकारी मालकीची एअर इंडियाही अखेरच्या घटका मोजत आहे. दोन्ही कंपन्यांचा मिळून भारतीय हवाई उड्डाण क्षेत्रात एकूण २५ टक्के बाजार हिस्सा आहे.
6 वर्षांपूर्वी -
कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे हावडा येथून नवी दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेस क्रमांक १२३०३ ला शुक्रवारी रात्री जवळपास १ वाजताच्या दरम्यान अपघात झाला आहे. या एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले आहेत. कानपूरपासून जवळपास १५ किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला असून अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे समजते आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर चीनच्या दुप्पट, आकडा १३६ कोटींवर
भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, २०१० ते २०१९ या दहा वर्षाच्या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा