महत्वाच्या बातम्या
-
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात घट
रिझर्व्ह बँकेनं गृहकर्ज घेणाऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने आज रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आले आहेत. २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत या निर्णय घेण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
इस्त्रोची भव्य कामगिरी! एमिसॅटसह २८ देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आज आणखी एक नवा इतिहास रचला आहे. श्रीरहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅटसह विविध देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले आहेत. यात उपग्रहात भारताचा एक, अमेरिकेचे 24, लुथानियाचे 2 तर स्पेन आणि स्विजर्झलँडचे प्रत्येकी एक अशा तब्बल २९ उपग्रहांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय शास्त्रज्ञांची अंतराळ क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून आज सकाळी ११:४५ ते १२:०० वाजताच्या दरम्यान मी जनतेशी संवाद साधून एक संदेश देणार असल्याचे म्हटले. जवळपास सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी जनतेला संबोधित केले. भारताने आज अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात मोठी झेप घेतली, असे म्हणत त्यांनी शास्त्रज्ञांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा केली. अमेरिका, चीन, रशियानंतर हे पाऊल उचलण्यात भारताचा जगात चौथा क्रमांक ठरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची घटना समजली जात आहे. विशेष म्हणजे ही मोहीम यशस्वी करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं मोदींनी सांगितलं. देशाला शास्त्रज्ञांचा अभिमान असल्याचं ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
पेड सर्व्हे? लोकसंख्या १३० कोटी आणि १६,९३१ लोकांनी देशाचा ओपिनियन पोल ठरवला?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हवानिर्मितीसाठी पुन्हा पेड सव्हेने तोंडावर वर काढल्याचे दिसत आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? असे मथळे छापून आणि प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांसाठीच हे केलं जात आहे केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस
भारतासह अमेरिका, युरोप आणि जगातील अनेक ठिकाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झालं आहे. जवळपास ३० मिनिटांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प आहे. लाखो फेसबुक युजर्सचं अकाऊंट सुरू होत नाहीय, तर अनेकांना लाईक आणि कमेंट करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे ट्विटरवर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
इथिओपियातील विमान दुर्घटनेत १५७ प्रवाशांचा मृत्यू, ४ भारतीयांचा समावेश
इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या विमानातून एकूण १४९ प्रवासी आणि ८ कर्मचारी प्रवास करत होते. विमान कोसळून तब्बल १५७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ भारतीय प्रवाशांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरतो
पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदी सध्या इग्लंडची राजधानी लंडनमध्ये राहत असल्याचे समजते आहे. द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने मोदीचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात तो लंडनच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय
आज अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्यात येणार आहे. अयोध्या प्रकरणात मध्यस्थ नेमावा किंवा नाही यावर आदेश देण्यात येणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक खंडपीठ निर्णय देणार आहे. दरम्यान, मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता त्यामुळे आजच्या या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
CRPF शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी मागितले दहशतवाद्यांच्या मृतदेहांचे पुरावे
पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या यूपीतील २ सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांने एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात किती दहशदवादी ठार झाले त्याचे पुरावे मागितले आहेत. भाजपचे नेते आणि प्रसार माध्यमं निरनिराळे आकडे सांगत असले तरी भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेल आहेत यावरुन विरोधक, आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमं तर प्रश्नचिन्ह उपस्थित करतच आहेत. परंतु आता शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी देखील किती दहशदवादी मारले गेले त्याचे पुरावे मागितले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्ये प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? की 'मध्यस्थी'ची प्रक्रिया?
अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. CJI रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पीठ बुधवारी अयोध्या प्रकरणात ‘मध्यस्थता’ व्हावी किंवा नाही याबद्दल निर्णय घेणार आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी गेल्या सुनावणीत मध्यस्थीचा पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. याप्रकरणी चर्चा करून कोर्टाबाहेर तंटा सुटण्याची अवघा एक टक्का शक्यता असेल तरी ती शक्यता पडताळली पाहिजे, असं मत गेल्या सुनावणीत कोर्टात व्यक्त केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर हाय अलर्ट; दहशदवादी हल्ल्याची भीती
मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी ३ महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी अरबी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी! बातमीचं वृत्तांकन करताना जरा ताळतंत्र बाळगा: आनंद महिंद्रा
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाईदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तान सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत केली. सदर वृत्तानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात वातावरण पसरलं आहे. परंतु, मागील काही दिवसांत भारतीय वृत्तवाहिन्यांनी पुलवामा आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचं केलेलं वृत्तांकन अनेकांच्या पचनी पडलेलं नाहीये. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भारतीय प्रसारमाध्यमांनाच हवं आहे, त्यामुळे या वाहिन्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणी देखील समाज माध्यमांवरून होताना दिसते आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानकडून भारताविरुद्ध युद्धाची तयारी, लष्कर आणि रुग्णालयं सज्ज
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने स्वतःच युद्धाची पूर्वतयारी करण्यात सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: ते हिंदू आहेत, दंगली भडकवण्यासाठी मुस्लिम बनून पाकिस्तान जिंदाबाद बोलतात?
पुलवामा हल्ल्यानंतर समाज माध्यमांच्या आडून अनेक वाईट प्रवृत्तीची लोकं एकत्र येऊन आणि पाकिस्तान विरुद्धच्या बिघडलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली भडकतील अशी कृत्य करत आहेत. याचा संबंध काही राजकीय पक्षांसोबत देखील असू शकतो अशी शक्यता आहे, जे निवडणुकीआधी वातावरण दूषित करू इच्छित आहेत. परंतु, ठरवून सदर कृत्य करताना त्या तरुणांचा मूर्खपणा देखील उघड झाला असून, ते काही तरी हेतूने करत असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
इतिहासाचा अभ्यास करता पाकिस्तानला काश्मीरचा दावा करण्याचा अधिकार नाही - सौदी प्रिन्स
इतिहासाचा अभ्यास करता पाकिस्तानला काश्मीरचा दावा करण्याचा अधिकार नाही – सौदी प्रिन्स
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वेवरील तब्बल अकरा तासांचा मेगाब्लॉक संपला
लोअर परळच्या डिलाईल रोड पुलाच्या पाडकाम तसेच बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. या मेगा ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एक सुद्धा लोकल धावली नाही. हा ब्लॉक आता पूर्ण झाला असून पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीला सुरुवात झाली आहे. आता पश्चिम रेल्वेवरील मेल आणि एक्स्प्रेसची वाहतूक सुद्धा पूर्णपणे सुरळीत झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पहिली चर्चगेट-विरार लोकल रवाना झाली.
6 वर्षांपूर्वी -
राजपथावर शक्तिप्रदर्शन, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते 'ध्वजारोहन'
देशभरात आज ७० वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत राजपथावर देशाच्या तिन्ही दलाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत तिरंग्याला मानवंदना दिली. तसेच देशातील अनेक राज्यांच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचं दर्शन सुद्धा राजपथावर घडलं.
6 वर्षांपूर्वी -
७० व्या प्रजासत्ताक दिनी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
आज ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली तसेच संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत आज राजपथावर दिमाखदार संचलन पार पडणार आहे. दरम्यान आजच्या सोहळ्याला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख यांना ‘भारतरत्न’ जाहीर
देशातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार केंद्र सरकारकडून जाहीर झाले आहेत. देशातील त्या त्या क्षेत्रातील उत्तुंग आणि भव्य कामगिरीसाठी भारतरत्न पुरस्कार दिले जातात. दरम्यान यंदाचे भारतरत्न तीन व्यक्तिमत्वांना जाहीर करण्यात आले असून त्यात भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, गायक भूपेन हजारिका आणि मराठी सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशाची विविधता हीच आपल्या देशाची ताकद : राष्ट्रपती
भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना संबोधित केले. देशातील सर्व उपलब्ध संसाधनांवर प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे. देशाचा नागरिक हा कोणत्याही समाजाचा, समूहाचा असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील असो, आपन सर्व समान आहोत. विविधता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आणि ओळख आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News