महत्वाच्या बातम्या
-
आदर्श घरभाडे कायदा | घरमालकास आता 2 महिन्यांपेक्षा जास्त ॲडव्हान्स आता घेता येणार नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात आदर्श घरभाडे कायदा (मॉडेल टेनेन्सी अॅक्ट) मंजूर केला आहे. कायद्यात घरमालक व भाडेकरू यांच्या हिताची कायद्यात तरतूद आहे. घरभाड्यासंबंधीचे तंटे मिटवण्यासाठी लवाद किंवा न्यायालय स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. नव्या कायद्यानुसार आता घरमालकांना भाडेकरूकडून २ महिन्यांच्या भाड्याची आगाऊ रक्कम घेता येणार नाही. त्याचबरोबर भाडे थकलेले असल्यास किंवा भाडेकरू घर सोडत नसल्यास घरमालक त्याच्याकडून २ त ४ पट भाडे वसूल करू शकतो, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
24 तासात 3.5 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर 2.18 लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले
देशात कोरोना रुग्ण व मृतांच्या संख्येत दररोज सतत वाढच होत आहे. भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रूपांतर भयानक संकटात झाले आहे. रुग्णालये भरली आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हताश रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही - WHO
राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. राज्य सरकारकडून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यात संतापजनक राजकारण | भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक पुरवठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रायव्हेट कंपनीत नोकरी करताय? | मग 1 एप्रिलपासून पगाराची नवीन सिस्टीम
येत्या 1 एप्रिल 2021 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षानंतर पगारदार वर्गाला मोठ्या बदलांचा सामना करावा लागणार आहे. कारण आता सर्व पगारदार वर्गासाठी सरकारकडून ‘पगार व्यवस्था’ आणली जात आहे. जर ही व्यवस्था लागू झाल्यास तुमच्या खात्यात पगाराची रक्कम कमी येऊ शकते. याचा परिणाम पगारदारांवर होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिशाला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं | न्यायाधीशांसमोर तिचे डोळे भरून आले
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केले आहे. फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे टूलकिट एडिट केल्याचा आरोप | युवतीला अटक
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून एका 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्टला अटक केली आहे. दिशा रवी असे तिचे नाव असून, ती फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक आहे. दिशावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा अचानक राजीनामा
रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांनी राजीनामा दिला आहे. सध्या रिपब्लिकचे अनेक कर्मचारी टीआरपी घोटाळ्यात अडकले असून अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अगदी स्वतः अर्णब गोस्वामी तसेच CEO देखील मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला | महापुरात 150 ते 200 लोकं बेपत्ता असण्याची शक्यता
उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प्रचार केला तात्यांचा आणि पद्म पुरस्कार आबांना | कोणी लगावला टोला?...
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (२५ जानेवारी) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ७ जणांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. १० नामवंत व्यक्तींना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ७ नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत २९ महिला, १० विदेशातील नागरिक तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. एकूण १६ महान व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Republic Day 2021 | राजपथावर पथसंचलनाला सुरुवात | देशभरात उत्साह
देशात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. देशावर करोनाचं संकट असलं तरी देशवासियांत मात्र उत्साह कायम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथाहून आज परेड निघणार आहे. दुसरीकडे दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून आज ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजपथावर आणि राष्ट्रीय राजधानीच्या सीमांवर हजारो सशस्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
टाइम्सनाऊ'वर अर्नबचा 'गिधाड' असा उल्लेख | अर्थात देशासाठी नव्हे तर वयक्तिक खुन्नस
अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यानच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणानंतर काही वृत्त वाहिन्या आणि विशेष करून रिपब्लिकच्या मुख्य स्पर्धक वृत्तवाहिन्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये टाइम्सनाऊ, इंडिया टीव्ही आणि इंडिया टुडेच समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भटका कुत्रा आणि सिंहिणीमध्ये जबरदस्त लढाई
सध्या इंटरनेटवर आणखी एक मनोरंजक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भटक्या कुत्र्याची आणि सिंहिणीची भयंकर लढाई सुरू आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं असून एका भटक्या कुत्र्याचा आणि सिंहिणीच्या लढाईचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Driving License रिन्यू करायचे आहे | जाणून घ्या ऑनलाईन रिन्यू पद्धत
भारतात ड्रायव्हिंग लायसन्स असे एक कागदपत्र आहे जे तुम्हाला देशभरात वाहन चालवण्याची परवानगी देते. ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना दिले जाते. ड्रायव्हिंग लायसन्स वरील तारीख संपल्यानंतर ते तुम्हाला रिन्यू करावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स अशा व्यक्तिंसाठी गरजेचे आहे जे सार्वजिनक रस्त्यांवर कार किंवा बाईक चालवतात. त्यामुळे नेहमीच कोणतेही वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पण जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स व्यतिरिक्त वाहन चालवत असल्यास तुम्हाला दंड भरावा किंवा ते सीज होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
कोंबड्यांचा ट्रक उलटला | आजूबाजूच्या कोंबडीचोरांकडून ३०० कोंबड्यांची लूट
आपल्या देशात एखादी फुकट मिळविणार असेल तर तुटून पडण्याची संधी लोकं अजिबात सोडत नाहीत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यात विषय पोटपूजेशी संबंधित असेल तर विचारायला नको. तसाच प्रकार मध्य प्रदेशातील बडवाणी भागात घडला आहे. झालं असं की कोंबड्यांची माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आणि ट्रक उलटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
ड्रायव्हिंग लायसन्स, RC बूक | वाहनांच्या सर्व कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत
कोरोना वायरस संकटकाळामध्ये आता केंद्र सरकारने वाहनांशी निगडीत नियम आणि कागदपत्रांच्या नियमांमध्ये पुन्हा शिथिलता देत वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांचं रजिस्ट्रेशन आणि फीटनेस सर्टिफिकेट्स यासारखी महत्त्वाची कागदपत्र आता रिन्यू करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पासून संपली असेल तरी त्याला 31 मार्च 2021 पर्यंत वॅलिड मानलं जाणार आहे. कोरोना वायरसच्या या काळात सरकारने हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज काही वेळापूर्वीच केंद्रीय परिवहन खात्याने याबाबत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बहुतांश मुली लिव्ह इन रिलेशनशिप संपले की बलात्काराची तक्रार करतात - किरणमयी नायक
देशात महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. महिलांवरी अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका जवाबदारीच्या पदावर बसलेल्या महिलेच्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. “बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BSNL Skylo Box | गावखेड्यात टॉवर नसतानाही मिळणार सुपर इंटरनेट आणि नेटवर्क
सरकारी मालकीच्या BSNL’ने देखील मोठा निर्णय जाहीर केला आहे. BSNL’ने आणखी एक बेस्ट सेवा आणून आपली पकड आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे. इतके सगळे ऐकून आपल्याला त्या भन्नाट अशा सेवेची उत्सुकता आणखी वाटत असेल नाही..! होय, आता यापुढे अगदी मोबाईल टॉवर किंवा ओएफसी केबल यांची जोडणी नसतानाही BSNL कंपनीची सेवा मिळणार आहे. थेट बेस्ट इंटरनेट कनेक्टीव्हिटी देण्याच्या या उपकरणाची घोषणा कंपनीने केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील सर्वात प्रभावी लस बनविणाऱ्या फायझरचा भारत सरकारकडे परवानगीसाठी अर्ज
युनायटेड किंगडमने (Great Britain Government) त्यांच्या देशात अमेरीकन औषध निर्माती कंपनी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला (Pfizer Biontech CoronA vaccine) नुकतीच मंजुरी दिली आहे. कोरोना लसीला मान्यता देणारा यूके हा पहिलाच पाश्चिमात्य देश ठरला आहे. त्यामुळे UK मध्ये पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी (Medicine and Healthcare Products Regulatory Authority) अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. तसेच बाहरीन देशानेदेखील फायझरच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान युकेमध्ये लसीला मंजुरी मिळाल्यानंतर फायझर कंपनीने त्यांच्या कोरोना लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशातील ‘या’ बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली विकतात साखरेचा पाक
देशातील अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेच्या पाकची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचे या तपासाद्वारे समोर आले (Big Honey Brands companies in the country are selling sugar syrup under the name of honey) आहे. सीएसईने १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचेही दिसून आले (Up to 77 per cent of these companies’ honey has been found to be adulterated) आहे. मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्याचे माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL