महत्वाच्या बातम्या
-
कोरोना व्हायरस 'जागतिक साथीचा रोग' असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरसला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगातील ११४ देशांमधील १ लाख १८ हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार २९१ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळं बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर पॅन्डेमिक अर्थात ‘जागतिक साथीचा रोग’ म्हणून कोरोना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी ही घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'ती' कोरोनातून सुखरूप बाहेर आली आणि आता जगाला आत्मविश्वास दिला
सध्या चीनसह जगभरात करोना व्हायरसने थैमान घातला असून सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने आपले अनुभव शेअर केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुलांची काळजी घ्या! केरळात ३ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण - सविस्तर वृत्त
कोरोना व्हायरसची लागण भारतात हळूहळू वाढू लागली आहे. देशात आतापर्यंत ४१ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे तपासात आढळून आले आहे. जगातील इतर देशांमध्ये इटलीत कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ३६६ वर जाऊन पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कपाळ! कंपन्या वार्षिक पगारवाढ देताना रडतात आणि मोदी सरकार 'हा' कायदा आणणार
प्रत्येक सर्वसामान्य नोकरदार वर्षातून एकदा होणाऱ्या पगारवाढीकडे मोठ्या आशेने बघत असतो. मात्र सरकारकडे अशी कोणतीच यंत्रणा नाही ज्या मार्फत या कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ मिळाली का याची खात्री केली जाते. आजही अनेक कंपन्या किमान वेतन कायदा अक्षरशः धाब्यावर बसवतात. आधीच खाजगी कंपन्या आर्थिक मांडीत प्रचंड तोटा सहन करत असताना आता केंद्र सरकार केवळ प्रसिद्धी होईल असा कायदा आणण्याची तयारी करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय
इटलीतून आलेल्या काही पर्यटकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले असतानाच आता कोची येथे इटलीतून आलेल्या एका जहाजावरील ४५९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ असे या जहाजाचे नाव असून ते कोची बंदरात आले आहे. मंगळवारी त्यावरील सर्व प्रवाशांची ताप व इतर लक्षणांबाबत तपासणी करण्यात आली आहे. यातील ४५९ प्रवासी उतरले असून त्यातील ३०५ भारतीय आहेत. सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याची माहिती कोची पोर्ट ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी जिजो थॉमस यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
प्रसिद्धीनंतरच्या वागणुकीचा परिणाम; रानू मंडलवर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ?
पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गात स्वतःचं पोट भरणाऱ्या सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्या त्याच्या हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली आणि त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचार: शाहरुखला दिल्ली पोलिसांकडून अटक
दिल्ली हिंसाचारावेळी गोळीबार करणाऱ्या शाहरुखला ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेशातील शामली इथून शाहरुखला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिल्ली हिंसाचाराच्या दरम्यान थेट पोलिसांवरच शाहरुखने पिस्तुल रोखलं होतं. त्याने तीन राउंड फायर केले होते. शाहरुखची चौकशी सुरू असून तो टिकटॉक व्हिडिओ करायचा तसेच मॉडेलिंगची आवड असल्याचंही समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह
सध्या चीन, दक्षिण कोरियामध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. दिल्लीत कोरोना विषाणूचे पहिले प्रकरण समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. त्याचबरोबर तेलंगणातूनही एक रुग्ण कोरोनाने पीडित आढळून आला आहे. दिल्लीत जो कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे, तो इटलीतून आला होता, असे सांगण्यात येते. दुसरा व्यक्ती दुबईतून आला आहे. यापूर्वी केरळमध्ये कोरोना विषाणूचे ३ रुग्ण समोर आले होते.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचार: भाजप नेत्यांवर ठपका ठेवणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचार : मौजपुरमध्ये गोळीबार करणारा शाहरुख पोलिसांच्या ताब्यात
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लाभले. या हिंसाचारात एकूण ५ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ४ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CAA: जाफराबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, गोळी लागून कॉन्स्टेबलचा मृत्यू
दिल्लीतील जाफराबादमध्ये सीएएविरोधात आंदोलन सुरु आहे. सोमवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी अनेक गाड्यांना आग लावली. यादरम्यान गोळी लागल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रतनलाल असे मृत्यू झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते गोकूळपूर एसीपी कार्यालयात तैनात होते. कोणाच्या गोळीमुळे रतनलाल यांचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
5 वर्षांपूर्वी -
CAA समर्थक आणि CAA विरोधक एकमेकांना भिडले
दिल्लीतल्या झाफराबाद परिसरात सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सीएए समर्थक आणि सीएए विरोधक एकमेकांना भिडलेत. मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली आहे. दुर्गापूरी आणि मौजपूर परिसरात दगडफेक झाली आहे. या ठिकाणी निमलष्करी दलालाही पाचारण करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा अटक
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा आफ्रिका खंडातील सेनेगल या देशात अटक करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी व कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून आज संध्याकाळी किंवा उशिरा रात्री त्याला घेऊन पोलीस भारतात परततील, अशी शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
तरुणाच्या गुप्तांगामध्ये पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकून मारहाण, संतापजनक प्रकार
चोरीचा आरोप करत मोटारसायकल एजन्सीमध्ये तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गावातील काही समाजकंटकांनी आधी युवकाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील पांचौड़ी परिसरात घडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Corona Virus: दिल्लीत सर्दीची तपासणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले...पण?
चीनमधील कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत या आजारामुळे तब्बल १५०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि हजारोंच्या संख्येने लोक पीडित आहेत. हुबेई प्रांतातील वुहान या भागात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण पूर्व चीनमधील एक व्यक्ती कोरोना व्हायरसने संक्रमित महिलेजवळ केवळ १५ सेंकद उभा होता. आणि केवळ १५ सेंकदात त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या अविकसित गुजरातच्या भिंती इंग्लंडच्या प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या; देशाचे वाभाडे
राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्या भारत दौऱ्यासाठी आपण अत्यंत उत्साही असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत ५ ते ७ लाख लोक माझं स्वागत करतील, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यात मोटेरा स्टेडिअमच्या नूतनीकरणानंतर निर्माण झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमचं लोकार्पण करणार आहेत. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असेल.
5 वर्षांपूर्वी -
CAA विरोधी आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही: हायकोर्ट
‘एखाद्या कायद्याविरोधात कुणी शांततेच्या मार्गानं आंदोलन करत असेल तर त्याला गद्दार किंवा देशद्रोही ठरवलं जाऊ शकत नाही,’ असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नोंदवलं आहे. सीएए विरोधी आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याच्या विरोधात न्यायालयात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हे मत व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शुल्लक भांडणावरून पत्नीचं मुंडकं कापून थेट पोलीस ठाण्यात पोहोचला
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुल्लक घरगुती वादात पतीने पत्नीची हत्या केली आणि तिचा थेट शिरच्छेद केला आणि पोलिस स्टेशन गाठले. त्या युवकाला पाहून पोलिस कर्मचारीही बुचकळ्यात पडले होते. अखिलेश रावत असे आरोपीचे नाव आहे. तो बाराबंकीच्या जहांगीराबाद पोलिस स्टेशन परिसरातील बहादूरपूर गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नीचं मुंडकं जहानगीराबाद पोलिस ठाण्यात नेले होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस: चीनमधून ३२४ भारतीय विशेष विमानाने मायदेशी परतले
कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आलं. ते सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती