महत्वाच्या बातम्या
-
करोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी; वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल
भारतातील केरळ येथे चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर केरळ आणि भारतातील शहरात दक्षता बाळगण्यात येत आहे. याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल; भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणणार.
5 वर्षांपूर्वी -
असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना: निर्भयाच्या आईचा आक्रोश
निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपींची पुन्हा एकदा फाशी टळल्याने निर्भयाची आई संतापली असून प्रचंड हताशही झाली आहे. ७ वर्षांपूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. सरकार वारंवार मला त्या आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. परंतु जे काही सध्या सुरू आहे, त्यामुळे आरोपींना बळ मिळत आहे. जर असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना, असा आक्रोश निर्भयाच्या आईने व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
निर्भया सामूहिक बलात्कार: नराधमांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती
निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निर्भया प्रकरणी फाशी आगामी आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या १ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. परंतु दिल्ली कोर्टाने फाशीची शिक्षा पुढे ढकलली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकत्व कायद्यात सुधारणा म्हणजे गांधींजींची स्वप्नपूर्ती : राष्ट्रपती
२०२० च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केले. याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सितारमण आर्थिक सर्वेक्षण सुद्धा सादर करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे २०२० चे पहिले अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणे हे आम्हा सर्वांचे प्रयत्न राहील असेही पंतप्रधान म्हणाले आहेत. सोबतच, या अर्थसंकल्पात सामान्य लोकांच्या सशक्तिकरणावर सार्थक चर्चा व्हावी असेही ते पुढे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश: थरारनाट्य संपलं; सुभाष बाथम मारला गेला; २० मुलांची सुटका
उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये एका इसमानं ओलीस ठेवलेल्या २० लहान मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटकेच्या कारवाई दरम्यान एनएसजी कमांडोंशी झालेल्या चकमकीत आरोपी सुभाष बाथम मारला गेला आहे. तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शर्जीलला हवा इस्लामी भारत; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या विरोधात निदर्शनं करताना चिथावणीखोर भाषण करणारा ‘जेएनयू’चा विद्यार्थी शर्जील इमाम याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. ‘शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणाऱ्यांपैकी आहे,’ अशी कबुली त्यानं पोलिसांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं.
5 वर्षांपूर्वी -
स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज: रतन टाटा
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मूर्ती यांची इन्फोसिस आणि टाटा समूहातील ‘टाटा कन्सल्टन्सी’ या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मात्र टाटा यांचा अनुभव आणि त्यांचे ज्ञान नेहमीच इतर उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. ८२ वर्षीय रतन टाटा यांना कॉर्पोरेटमध्ये आदराचे स्थान आहे. त्यामुळेच टाटा यांना पुरस्कार दिल्यानंतर मूर्ती आपसूकच त्यांच्यासमोर झुकले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. टाटा यांनीही मूर्ती यांना तशाच प्रकारे प्रतिसाद दिला. ते म्हणाले की नारायण मूर्तीसारख्या एका श्रेष्ठ मित्राकडून हा पुरस्कार मिळेल हे माझे भाग्य समजतो, अशी भावना टाटा यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; शत्रूचं विमान ३५०० कि.मी दूरवर हवेतच नष्ट होणार
चीनची राजधानी बीजिंग पासून पाकिस्तानचे सर्व शहरांना आपल्या कवेत घेण्याची क्षमता असलेली स्वदेशी निर्मित के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज भारताकडून करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जवळपास ३५०० किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून ते शस्त्र घेऊन जाण्यात सक्षम आहे. या चाचणीनंतर भारतीय लष्कर पाणबुडीमधून शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष्य भेदण्यासाठी आणखी मजबूत झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मशिदीत पार पडला हिंदू विवाह, मुस्लीम समाजाचा पुढाकार आणि १० तोळं सोनं दिलं भेट
केरळमधील लोकांनी पुन्हा एकदा सामाजिक भान जपले आहे. रविवारी केरळच्या अलप्पुझामधील एका मशिदीत हिंदू जोडप्याचे रितीरिवाजानुसार लग्न पार पडले. या लग्न समारंभाला मुस्लिम आणि हिंदू समाजाचे लोक उपस्थित होते. या लग्न समारंभाचे आयोजन चेरूवली मुस्लिम जमात मशिदीने केले होते.
5 वर्षांपूर्वी -
JNU'च्या दर्जाबाबत सरकार तोंडघशी, UPSC IES'मध्ये ३२ पैकी जेएनयूचे १८ विद्यार्थी उत्तीर्ण
JNU’बाबत भाजपने नेहमीच आक्रमक भूमिका घेत अनेकांनी या विद्यापीठावर बंदी घालण्याची देखील भाषा केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना आणि केंद्रातील मंत्र्यांनी देखील जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप वारंवार केला आहे. त्यात भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच अग्रणी असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात केंद्र सरकार तर जेएनयूला’बाबत नेहमीच दुटप्पीपणानं वागत असल्याचा आरोप विरोधकांनी देखील अनेकवेळा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कन्नौजः ट्रक-बसच्या भीषण अपघातात २० जणांचा होरपळून मृत्यू, २१ जण जखमी
उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात २० जण ठार झाले तर अनेक जण जखमी आहेत. ट्रक आणि खासगी बसमध्ये हा अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागल्याने अनेक प्रवासी आगीत होरपळले. दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४३ प्रवासी होते, अशी माहिती आहे. काही प्रवाशांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले तर बहुतांश प्रवासी बसमध्ये अडकल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
देशातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी; फडणवीसांच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
देशातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार २०१८ या एकाच वर्षात तब्बल १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी होऊनही, महाराष्ट्रात तब्बल ३ हजार ५९४ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. गेल्या वर्षात महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह विविध आत्महत्यांचा आकडा हा १७ हजार ९७२ वर पोहोचला आहे. यामध्ये ३५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
केरळात CAA विरोध: भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांना बंदी असल्याचे घराबाहेर स्टिकर्स लावले
देशभरात सध्या CAA वरून वातावरण तापल्याच दिसत आहे. देशभरात भाजपाला देखील त्यामुळे प्रचंड रोष सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये या विरोधाने रुद्र रूप धारण केले आहे. त्याचा रोष थेट मोदी आणि अमित शहा यांना देखील सहन करावा लागत आहे. आज खेलो इंडिया या युवा राष्ट्रीय स्पर्धेला साममधल्या गुवाहाटी येथे १० जानेवारीसून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला मोदी येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या जीवाला असणारा मोठा धोका टाळण्यासाठीन नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेश: शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार १५ हजार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या महिलांच्या खात्यात वर्षाला १५ हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मास्टमाईंड देवडीकरला बेड्या ठोकल्या
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४ वर्षे) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
JNU हल्ला: बंगळुरू'मध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार निदर्शन
जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहेत. त्या कॅम्पसमधील आंदोलनात अनेक सिलीब्रीटी व्यक्ती देखील सामील होतं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत. देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थी देखील या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'जेएनयू' हल्ल्याचे पडसाद; देशभरात विद्यार्थ्यांची निदर्शने
जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस, एम्स तसेच दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.
5 वर्षांपूर्वी -
भारताची अर्थव्यवस्था लवकरच अतिदक्षता कक्षातून रुग्णशय्येवर जाणार: माजी आर्थिक सल्लागार
भारताची अर्थव्यवस्था ही ‘महामंदी’चा सामना करीत असून, लवकरच तिची रवानगी अतिदक्षता कक्षात होऊ घातली आहे, असा घणाघात मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देशाचे आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमणियन यांनी आपल्या नव्या शोध-अहवालात केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
टाटा समूहाला धक्का, सायरस मिस्त्री पुन्हा समूहाचे अध्यक्ष होणार
राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पुन्हा एकदा टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय चुकीचा होता असं राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने म्हटलं आहे. सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या निर्णय़ाविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने धाव घेतली होती. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जुलै महिन्यात निर्णय सुरक्षित ठेवला होता.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजुरीनंतर आसाममध्ये बंद; हिंसक वळण
बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती