महत्वाच्या बातम्या
-
चीनच्या कुरापती सुरूच | सीमेवर भारत आणि चिनी सैनिकांच्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी
भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती अजूनही सुरूच आहे. नियंत्रण रेषेवर चीनने सैनिकांचा फौजफाटा जमवलेला असतानाच तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवांनानी चिनी सैनिकांचा हा प्रयत्न हाणून पडला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
गलवान खोऱ्यात भारताविरोधात हिंसाचार हा चीनचा कट | अमेरिकेचा दावा
चीनचा खरा विघातक चेहरा पुन्हा जगासमोर समोर आला आहे. अमेरिकेने याबाबत खुलासा केल्याने जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. भारत चीनच्या सीमेवरील लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराचा कट चीनने आखला असल्याचे अमेरिकेच्या संसदीय समितीच्या (US parliamentary committee on Galvan Valley in Ladakh Indo-China border) अहवालात स्पष्ट म्हटले आहे आणि त्यामुळे चीन तोंडघशी पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा | चीन विरोधात मदत होणार
भारताने अमेरिकेसोबत ऐतिहासिक BECA करार केला आहे. भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. BECA करारामुळे भारत-अमेरिका लष्करी संबंध अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे चिनची चिंता वाढली आहे. भारत आणि चीनमध्ये मागच्या आठवडयात आठव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक होणार होती. पण चीनने जाणीवपूर्वक या बैठकीला विलंब केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
माइक पॉम्पियो भारतात | चीनच्या मुद्यावरून भारत-अमेरिकेदरम्यान महत्वाची बैठक
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo, Secretary of State) पत्नीसह दिल्लीत दाखल झाले. भारत आणि अमेरिका २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीच्या निमित्ताने २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्परही (Mark Esper, Defense Secretary) सहभागी होतील. भारतासोबतच्या चर्चेनंतर पॉम्पिओ श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांचाही दौरा करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
युद्ध झाल्यास चिनी लष्कर काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करेल अटल बोगदा | चीनचा दावा
अटल बोगद्याचे ३ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. १९७२ मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी सहा महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सन २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर २८ जून २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी १,३५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक | केंद्राची माहिती
भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अरब डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) केली आहे. सरकारनेच जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत – चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. ‘सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र (Time Tested Mechanism) आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख दौरा करून भारतीय जवानांची भेट घेतली आणि समस्त देशवासी आपल्या वीर जवानांसोबत उभे आहेत, हा त्यांना संदेशही दिला’ असं राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं.
4 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये भारताची ३८ हजार स्क्वे किमी जमीन चीनच्या ताब्यात | मोदी सरकारची कबुली
भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत निवदेन सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असंही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
पँगाँग फिंगर ८ पर्यंत भारताची हद्द | मात्र चिनी सैन्य फिंगर ८ पासून फिंगर ४ पर्यंत घुसल्याच वृत्त
मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जवळपास अडीच तासाची चर्चा झाल्यानंतरही दोन्ही देशात तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशातील सैनिक लडाखमध्ये शस्त्र आणि दारूगोळा घेऊन ३०० मीटर दूर आमने-सामने उभे आहे. याच दरम्यान जपान आणि ताइवान या दोन देशांनी चीनला आपल्या देशातील सीमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी चेतावणी जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिमाचल प्रदेशात चीनच्या हालचाली | हिमाचलमधील भाजपचा PPE Kit घोटाळा | आणि कंगना
लडाखमध्ये ताबा रेषेवर (LAC) चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यानंतर, चर्चा सुरू करून तणाव कमी करण्याचा दिखावा करणाऱ्या चीनने हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून रस्ता तयार केला आहे. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील कुन्नू चारंग हे शेवटचे सीमावर्ती गाव आहे. कुन्नू चारंगच्या ग्रामस्थांनी चीनच्या प्रदेशात रेकी केल्यावर हा दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांत चीनने सीमेवर सुमारे २० किलोमीटर लांब रस्ता बनवल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे गलवाण खोऱ्यात झालेल्या रक्तपातात भारतच जवान शहीद झाले होते त्यात हिमाचल प्रदेशातील सुपुत्र सेपॉय अंकुश ठाकूर हे देखील शहीद झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
चिनी सैनिकांच्या हातात तलवारी-भाल्यासारखी हत्यारे | चिनी युद्ध सदृश्य वातावरण करतोय
सोमवारी सायंकाळी भारतीय जवानांनी अडविल्यावर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी घुसखोरीचा प्रयत्ने केला असून गलवानसारखा धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय चौकीला धारधार हत्यारे हातात घेऊन 50 चिनी सैनिकांनी घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, धाडसी जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये पुन्हा तणाव वाढला | भारतानं वॉर्निंग शॉट्स फायर केल्याचा चीनचा आरोप
मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाग्रस्त स्थिती आहे. 29 आणि 30 ऑगस्टला रात्री चीननं पँगोग त्सो इथे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडल्यानंतर पुन्हा एकदा 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एकाबाजूने चीन तर दुसरीकडून पाकिस्तानही हल्ला करणार | बिपीन रावत यांचा गंभीर इशारा
लडाखमध्ये चीन युद्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे भारताने अरुणाचलप्रदेशसह एलएसीवरील भागात सैन्य कुमक वाढविण्यास सुरुवात केली असून सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी मोठा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली | नेपाळ आणि श्रीलंका'वर लक्ष ठेवा
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. भारताने श्रीलंका आणि नेपाळमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तसेच चीनच्या घुसखोरीवरही नजर असली पाहिजे. भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली सुरु आहेत. हा प्रदेश चीन सर्व बाजूंनी घेरत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातील चिनी नौदलाची उपस्थिती हा चिंतेचा विषय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
माध्यमांकडून फेक न्यूज | चिनी सैनिकांच्या कबरी १९६२ मधील | जोडली गलवान खोऱ्याशी
गलवान खोऱ्यात १५ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या भीषण सामोरामुळे २० भारतीय सैन्य जवान ठार झाले. दुसरीकडे, चिनच्या बाजूने नेमकं काय नुकसान झालं याची कोणतीही अधिकृत माहिती चीन सरकारकडून देण्यात आली नव्हती. केवळ निरनिराळ्या बाजूनी अंदाज बांधण्यात आले होते, ज्याला कोणताही पुरावा नव्हता. भारतीय माध्यमांनी देखील केवळ अंदाजच मांडले होते. मात्र आता भारतीय माध्यमांना याच विषयाला अनुसरून चुकीचे फोटो प्रसिद्ध करून फेक न्युज पसरविण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | लडाखमधील जवळपास १००० चौरस किमीचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली
लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य गेल्या ४ महिन्यांपासून आमनेसामने उभं ठाकलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैन्याचे मनसुबे उधळले आहेत. मात्र सीमेवरील तणाव वाढला असताना लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली गेल्याचं वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारत-चीनचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये | तणाव वाढला
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी LAC वरील स्थितीचा आढावा घेतला. डोवाल यांचं चीनशी कमांडर-स्तरावरील चर्चेकडेही लक्ष आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल अजित डोवल यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. गृहसचिव आणि गुप्तचर यंत्रणांचे प्रमुखही या बैठकीस उपस्थित होते. गुप्तचर यंत्रणांनी डोवल यांना चीनशी झालेल्या तणावाविषयी माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
आमच्याशी स्पर्धा कराल तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल - चीनची धमकी
भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सनं दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ड्रॅगनचा हेतू शंका घेण्यासारखा | लडाखजवळ आधीच तैनात केली J-20 फायटर विमाने
भारत चीन यांच्यात गेल्या मे महिन्यापासून सुरू असलेला तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
4 वर्षांपूर्वी -
पँगाँग टीएसओमध्ये भारताने चीनचा डाव उधळला | वातावरण पुन्हा तापलं
भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचं नाव घेत नाही. मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं पाहायला पुन्हा एकदा मिळालं. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS