महत्वाच्या बातम्या
-
काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या कारवाईत ७ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (3 ऑगस्ट) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरमध्ये तणावपूर्ण स्थिती; PDP व NCची आपत्कालीन बैठक; CRPFच्या सुट्या रद्द
अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णयाचा इतर कुठल्याही मुद्द्यांशी संबंध जोडू नका; तसंच कुठल्याही अफवा न पसरवता शांत रहा, असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातल्या राजकीय पक्षांना केलं आहे. अमरनाथ यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण आहे, असं सांगत काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली होती.
6 वर्षांपूर्वी -
'ते' ट्विट: सचिनला ट्रोल करणाऱ्या फिल्मी देशभक्तानी भारत-पाकिस्तान मॅचचा मनसोक्त आनंद लुटला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात तब्बल ४० हुन अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी पक्षाने समाज माध्यमांच्या आडून मोठं राजकीय भांडवल केल्याचे दिसले. देशात जर त्यानंतर नैसर्गिक देशभक्ती उफाळून आली असती तर उत्तम झालं असतं. मात्र तसं होता, पाकिस्तानला अनुसरून कोणी एखादा विषयावर मत व्यक्त केल्यास त्यांना ट्रॉलर्स’ने झोडपून काढणं म्हणजे समाज माध्यमांवरील एक कलमी कार्यक्रम झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
खरंच आपलं देशप्रेम क्षणिक झालं आहे? पुलवामा हल्ला ते क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी येत्या रविवारी म्हणजे १६ जूनला मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एकमेकांविरोधात खेळणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत हे सख्खे शेजारी राष्ट्र; पण पक्के वैरी सातव्यांदा एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. इतिहास आणि भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ बाजी मारेल हे नक्की आहे. पण, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, स्पर्धेवरच बहिष्कार घालावा अशी मागणी अनेक क्रिकेट चाहते करत होते. लोकसभेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवली असंच म्हणावं लागेल. कारण देश, ध्वज आणि सैनिकांप्रती असणारी नैसर्गिक देशभक्ती ही कधीच क्षणिक नसते आणि कोणी आपल्यात जागृत करण्याची गरज नसते.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राईक भारतीय लष्करानं केला, मोदींनी नव्हे: राहुल गांधी
वायुदलाने केलेला सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला नसून तो भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही: माजी लष्करप्रमुख व भाजप नेते व्ही.के.सिंग
भारतीय लष्कर ही ‘मोदी यांची सेना’ आहे, असे धक्कादायक वक्तव्य करणारे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले जनरल व्ही.के.सिंग यांनी चांगलीच चपराक दिली आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, अशाप्रकारे भारतीय सैन्याचा अपमान करणारेच देशद्रोही असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला हा निवडणुकांपूर्वी जैशकडून मोदींना व भाजपला मिळालेली एक भेट: रॉ R&A चे माजी प्रमुख
जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला दहशदवादी हल्ला म्हणजे लोकसभा निवणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाला मिळालेली एक भेट आहे, असं वक्तव्य रॉ या गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंगचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी शनिवारी केलं. तसेच पाकिस्तानात असणाऱ्या आतंकवादी तळांवर हल्ला करणं हे अगदी योग्य असल्याचंही मत देखील त्यांनी मांडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजौरीमध्ये पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
राजौरीमध्ये पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. राजौरीमध्ये आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. दरम्यान, दोन्ही बाजूंचा गोळीबार थांबला असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकला भाजपा आमदाराच्या अकाऊंटवरून अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने समाज माध्यमांवर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला दणका दिला आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केलेले २ पोस्टर हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने फेसबुकला दिले आहे. या दोन्ही पोस्टरवर अभिनंदन यांचे छायाचित्र होते.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन
पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन सुरू असून Locवर गोळीबार सुरूच आहे. मात्र भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेने, चर्चेने प्रश्न परिस्थिती बदलू शकते असे म्हटले परंतु तरीही आज पहाटेपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.
6 वर्षांपूर्वी -
युद्ध छेडल्यास विचार करणार नाही, पाकिस्तान थेट उत्तर देईल: इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं.
6 वर्षांपूर्वी -
अतिरेकी मार्गावरील मुलांना घरी परत बोलवा!...अन्यथा? भारतीय लष्कर
पुलवामामधील पिंगलान येथे काल भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीसंदर्भात भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने आज एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. दरम्यान, १०० तासांच्या आतमध्ये १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती भारतीय लष्कराने यावेळी दिली. तसेच जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहन आणि विनंती देखील करण्यात आली, ‘दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या आपल्या पाल्यांना समजवा आणि माघारी बोलवा.
6 वर्षांपूर्वी -
देवळाली रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी
देशभरात पुलवामा हल्ल्यामुळे भीतीचं आणि संतापाचं वातावरण असताना काल रविवारी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय हॅकर्स जाम भारी! पाकिस्तानच्या तब्बल २०० वेबसाईट्स हॅक
पुलवाम येथे CRPFच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना सर्वच भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यामुळे संतापलेल्या भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर सायबर हल्लाच चढवला आहे. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानमधील तब्बल २०० वेबसाईट्स हॅक केल्या असून त्यात सर्वाधिक भरणा हा सरकारी वेबसाईट्सचा आहे. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हॅक झालेल्या साईट्सवर या गटाचे नाव झळकताना दिसले तसेच काही वेबसाईट्स वर लढाऊ विमानातून तिरंगी धूर येताना दिसत होता.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा ‘जैश’ला दणका, काश्मीरमध्ये कमांडर कामरानचा खात्मा झाल्याचं वृत्त
चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही.
6 वर्षांपूर्वी -
जवानाच पार्थिव आलं आणि त्यासोबत भाजप मंत्र्याचा सेल्फी, सर्वत्र संताप व्यक्त
चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही. सध्या अनेक शहीद जवानांचे शव अंत्यविधींसाठी त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येत आहेत. दरम्यान, यावेळी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामात पुन्हा चकमक, मेजरसहीत ४ जवान शहीद
चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाहीयेत. दक्षिण-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्कराला लक्ष्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ला; काश्मीरमध्ये इंटरनेट बंद
काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. CRPF च्या माहितीनुसार, रस्त्यावर एका ४ चाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधील बॉम्बचा स्फोट झाला.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ला; महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल करांडे यांना वीरमरण
काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. सांगली जिल्ह्यातील CRPF जवान राहुल करांडे हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल