महत्वाच्या बातम्या
-
फोटो: या भारतीय महिला क्रिकेटपटूच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री सुद्धा कमी पडतील
बॉलिवूड अभिनेत्री या नेहमी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात असतात. त्या त्यांच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकतात. पण भारतीय महिला संघातील एका खेळाडूने या अभिनेत्रींनाही मागे टाकले. तिचे नाव प्रिया पुनिया. चला पाहुया प्रिया पुनियाचा ग्लॅमरस अंदाज. प्रिया पुनिया भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत निधन
भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बापू नाडकर्णी पवईतील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. बापूंच्या निधनाने एक बुजुर्ग आणि भारतीय क्रिकेट विश्वातील जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जेएनयू हल्ला: होय देश संकटात आहे; सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देश संकटात आहे, असे गावसकर यांनी म्हटले आहे. लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
इंदूर कसोटी: भारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात ३४३ धावांची विजयी अशी आघाडी घेतली होती. या डोंगरा ऐवढ्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव २१३ धावात संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी भारताने पहिला डाव घोषित केला. त्यानंतर ३४३ धावांचा डोंगर घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव देखील कोसळला. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील मुस्ताफिझूर रेहमान (६४) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. या विजयासह भारताने कसोटीमध्ये घरच्या मैदानावर सलग १३व्या विजयाची नोंद केली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
5 वर्षांपूर्वी -
पुणे कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय
भारतीय संघानं विराट कोहलीच्य नेतृत्वाखाली पुण्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवत मालिकेवर कब्जा केल आहे. भारतानं तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० नं आपल्या नावावर केली आहे. यासोबत टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतीय संघानं घरच्या मैदानावर आतापर्यंत ११ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही संघाला १० पेक्षा जास्त मालिका घरच्या मैदानावर जिंकता आलेल्या नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
विराटचा झंजावात, लारा-सचिनचे विक्रम मोडीत
क्रिकेटच्या मैदानावर दर सामन्यागणिक विक्रम करणारा भारतीय संघाचा कर्णधार व जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहली यानं आज क्रिकेटविश्वातील नवं शिखर ‘सर’ केलं. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये दीड शतक ठोकण्याचा सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम विराटनं आज मोडला. एवढ्यावरच न थांबता, कसोटीतील सातवं द्विशतक ठोकून त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा द्विशतकांचा विक्रमही मोडला. तसंच, कसोटीतील ७ हजार धावा पूर्ण केल्या. विराटच्या या खेळाच्या जोरावर भारतानं पुणे कसोटीत ६०० धावांचा डोंगर उभारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिका; यजमानांना व्हाईटवॉश
टी-२०, वन-डे पाठोपाठ विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत २५७ धावांनी बाजी मारत मालिकेत २-० अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.
5 वर्षांपूर्वी -
भारताची वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात
कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी फक्त संघासाठी नाही तर देशासाठी देखील खेळतो : रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाच्याच चर्चा गेल्या आठवडाभर रंगल्या. पण, कॅप्टन कोहलीनं या सर्व वृत्ताचं खंडन करताना संघात ऑल इज वेल असल्याचे सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत कोहलीनं या अफवा असल्याचे स्पष्ट केले. या सर्व वादावर रोहितनं आतापर्यंत कोणतही विधान केलं नव्हतं, परंतु बुधवारी त्यानं समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून स्वतःचं मत व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
अजिंक्य रहाणेच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे च्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अजिंक्यने पत्नी राधिका सोबतचा एक फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट करून, अजिंक्य बाबा होणार आहे ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेमीफायनलचा थरार! मँचेस्टरच्या मैदानात रंगणार टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड सामना
मागील सलग ५ आठवडय़ांच्या साखळी फेरीच्या थरारानंतर आता विश्वचषक स्पर्धा महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन धडकली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या ४ संघांनी अनेक अडथळे मोडीत काढत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. त्यापैकी आज म्हणजे मंगळवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी थेट भिडणार आहेत. भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा रंगतदार सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
वर्ल्ड कप २०१९ : आज टीम इंडियाचा मुकाबला श्रीलंकेशी
वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडिया शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. टीम इंडियाने ८ पैकी ६ सामने जिंकून सेमीफायनलचे तिकीट आधीच कन्फर्म केलं आहे. तर श्रीलंका याआधीच स्पर्धेबाहेर असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे हा सामना टीम दोनही संघांसाठी औपचारिकच असेल.
6 वर्षांपूर्वी -
विश्वचषकात पाकिस्तानला सातव्यांदा लोळवलं, भारताचं वर्चस्व कायम
जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताने पन्नास षटकात पाच बाद ३३६ धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव चाळीस षटकात ६ बाद २१२ धावांत रोखला गेला. दरम्यान पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या ५ षटकात १३६ धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. परंतु त्यांना केवळ ४६ धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.
6 वर्षांपूर्वी -
'ते' ट्विट: सचिनला ट्रोल करणाऱ्या फिल्मी देशभक्तानी भारत-पाकिस्तान मॅचचा मनसोक्त आनंद लुटला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात तब्बल ४० हुन अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी पक्षाने समाज माध्यमांच्या आडून मोठं राजकीय भांडवल केल्याचे दिसले. देशात जर त्यानंतर नैसर्गिक देशभक्ती उफाळून आली असती तर उत्तम झालं असतं. मात्र तसं होता, पाकिस्तानला अनुसरून कोणी एखादा विषयावर मत व्यक्त केल्यास त्यांना ट्रॉलर्स’ने झोडपून काढणं म्हणजे समाज माध्यमांवरील एक कलमी कार्यक्रम झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
ICC क्रिकेट वर्ल्ड कप २०१९: ऑस्ट्रेलियापुढे ३५३ धावांचे मोठं आव्हान
आयसीसी वर्ल्ड कप २०१९ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं. आज सर्वकाही भारताच्या बाजूनेच असल्यासारखं वातावरण होतं. भारत आणि कांगारू हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला.
6 वर्षांपूर्वी -
वर्ल्ड कपचं थीम सॉंग ऐकलंत?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या ३० मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सध्या जगभरात क्रिकेटची जादू दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)ने शुक्रवारी समाज माध्यमांवरून वर्ल्ड कपचं थीम सॉंग शेअर केलं आहे. ‘Stand By’ असे या गाण्याचे बोल असून Rudimental या बँडने हे गाणं गायलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
#IPL२०१९ - मुंबईचा ‘सुपर’ विजय; प्ले-ऑफमध्ये प्रवेश
आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने ‘सुपर ओव्हर’मध्ये हैदराबादवर विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि १३ सामन्यांमधून आठ सामन्यामध्ये विजय मिळवत १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. सामन्यात आणि सुपर ओव्हरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
आयपीएल २०१९: मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत चेन्नई-मुंबई या २ बलाढ्य संघातील लढतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काढलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने मुंबईने चेन्नईवर ४६ धावांनी सहज विजय मिळवला. धोनीच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#आयपीएल२०१९ - पंजाबचा राजस्थानवर १२ धावांनी विजय
मोहालीच्या मैदानावर अटीतटीच्या लढतीत अखेर पंजाबने राजस्थानवर १२ धावांनी मात केली. राहुलचे अर्धशतक आणि मिलरची फटकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने राजस्थानपुढे १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
6 वर्षांपूर्वी -
हार्दिकची तुफान फटकेबाजी; मुंबई इंडियन ‘विजयी’
आयपीएल २०१९ मध्ये हार्दिक पांड्याने फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाच गडी राखून पराभूत केले आहे. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. तर बंगळुरुचे पुन्हा एकदा पराभवाचे पाढे या सामन्यात पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो