महत्वाच्या बातम्या
-
आयपीएल २०१९: मुंबई इंडियन्सचा पंजाबवर रोमांचक विजय
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत पंजाब-मुंबई इंडियन लढतीत पंजाबचा सलामीवीर के.एल. राहुलने काढलेल्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणार्या पंजाबने २० षटकांत ४ बाद १९७ धावांची मजल मारली. दरम्यान, नाणेफेक जिंकल्यावर मुंबईचा कर्णधार पोलार्डने प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं.
6 वर्षांपूर्वी -
IPL २०१९: मुंबईचा चेन्नईवर दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानात जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर चेन्नईचा विजयरथ रोखला. यासह मुंबईने आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत शंभराव्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईचा तब्बल ३७ धावा अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
6 वर्षांपूर्वी -
आयपीएल २०१९: मुंबईचा बंगळुरूवर शानदार विजय
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत आज आपल्या दुसर्या लढतीत खेळताना बंगळुरूने माजी विजेत्या मुंबईला १८७ धावांतच रोखण्यात यश मिळविले. मुंबईच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून कर्णधार विराट कोहली व एबी डी व्हिलियर्सने शानदार फटकेबाजी केली.
6 वर्षांपूर्वी -
#IPL२०१९: आजपासून आयपीएलचा धमाका सुरू
बाराव्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेचा हंगाम आजपासून सुरू होत असून, सलामीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनीचा गतविजेता चेन्नई संघ आणि विराट कोहलीचा बंगळुरू संघ यांच्यात मुकाबला होणार आहे. तीनवेळा ही स्पर्धा जिंकणारा चेन्नई संघ जेतेपदाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मालिका विजयासाठी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार
भारत-ऑस्ट्रेलिया या संघांमधील मालिकेचा अखेरचा आणि निर्णायक सामना आज बुधवारी राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानात रंगणार असून आजचा सामना जिंकणारा संघ ही एकदिवसीय मालिका आपल्या नावावर करणार असल्याने दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोज शाह कोटला येथे होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतासमोर ३१४ धावांचे आव्हान
विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आज तिसर्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजय मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जात आहे. ५ सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले २ सामने जिंकून मालिकेत आघा़डी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ खेळेल. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३०० पार गेली असून भारतासमोर विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया; भारतापुढे विजयासाठी २३७ धावांचे आव्हान
आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया संघात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. उभय संघात ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
IPL - १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात इंडियन प्रीमिअर लीगही अर्थात आयपीएलच्या १२ व्या हंगामाचे सामने देखील रंगणार आहेत. आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २३ मार्चपासून सुरू होणा-या लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे एकमेकांसमोर ठाकणार आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात ठेवता २३ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत पहिल्या २ आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
India vs NZ T20 : भारताची न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून मात
भारतीय क्रिकेट टीमच्या गोलंदाजांचा भेदक मारा तसेच फलंदाजांच्या दमदार सलामीच्या जोरावर भारताने दुसरा ट्वेन्टी-२० सामना खिशात घातला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५८ धावांच लक्ष दिलं होतं. दरम्यान, भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर या आव्हानाचा सहज पाठलाग केला आणि यजमान्यांना धूळ चारली आहे.
6 वर्षांपूर्वी -
विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता
कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या हंगामात क्रिकेटमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी विजय मिळवला. विदर्भाचं हे रणजी करंडकाचं द्वितीय विजेतेपद ठरलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ : न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे आव्हान
विजय शंकरचं अर्धशतक ५ धावांनी, तर रायुडूचं शतक १० धावांनी हुकलं आहे. रायुडूनं ९० धावांच्या खेळीला ८ चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला. तर शेवटी हार्दिक पंड्याने २२ चेंडूत २चौकार आणि ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे लक्ष देण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ भारताचे ५ गडी बाद
न्यूझीलंड दौर्यावर असलेला भारतीय पुरुष क्रिकेट संघ आज होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून चौथ्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक असून या मालिकेत सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी देखील भारतीय संघ सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
NZ Vs IND न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय
हॅमिल्टन वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. दरम्यान, पहिले तीन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर किवींनी होम ग्राउंडवर पहिला विजय संपादित केला आहे. तसेच हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय क्रिकेट संघाच्या अक्षरशः चितड्या उडवल्या. भारताचा संपूर्ण संघ केवळ ९२ धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला.
6 वर्षांपूर्वी -
ICC T20 वर्ल्ड कप २०२०; आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
पुढच्या वर्षी २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. इतिहासात पहिल्यांदाच पुरुष आणि महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार खेळलेल्या जाणार आहेत. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताची तुफान फलंदाजी, ३२४ धावांचा डोंगर रचला
भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. दरम्यान आज भारतीय फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी करत यजमानांना मोठे लक्ष दिले आहे. रोहित शर्मा ८७ आणि शिखर धवनच्या ६६ धावांच्या जोरावर मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी केली. तसेच विराट कोहली ४३ आणि अंबाती रायुडू ४७ यांनी धावांची खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४ बाद ३२४ धावांचा डोंगर रचला.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ; भारतासमोर केवळ १५८ धावांचे लक्ष्य
ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वनडेमध्ये चमकदार कामगिरी करून दाखविल्यानंतर आता विराट कोहलीचा भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये सुद्धा फॉर्मात असल्याचे दिसते. कारण आजपासून ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध विजय संपादन करण्यासाठी विराट टीम सज्ज झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
Ind vs Aus 3rd ODI : भारताचा कांगारूंवर ऐतिहासिक विजय
महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा एकदा महत्वाची फलंदाजी केली आहे. कारण आज सुद्धा धोनीने मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने जोगरबाज खेळ करत विजयी कळस चढवला. चहलने ६ विकेट घेतल्या.
6 वर्षांपूर्वी -
चहलच्या फिरकीसमोर कांगारूंचा डाव गडगडला, भारतासमोर २३१ धावांचं आव्हान
कसोटी मालिकेपाठोपाठ आता वनडे मालिका देखील जिंकून भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियात आणखी एक पराक्रम करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आजच्या एकदिवसीय सामन्यात युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर कांगारूंनी अक्षरश: नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
India vs Aus 1st ODI : रोहित शर्मा खेळी निष्फळ, कांगारुंची विजयी सलामी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाला मूळ कारण ठरले आहेत. दरम्यान, कांगारूंनी विजयासाठी ठेवलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारताचे पहिले ३ फलंदाज केवळ ४ धावांवर तंबूत परतले. त्यात रोहित शर्माने १३३ धावांची जिगरबाज खेळी केली तर आणि महेंद्रसिंग धोनीने ५१ धावा करत रोहितला उत्तर साथ दिली होती.
6 वर्षांपूर्वी -
IND vs AUS 4th Test : भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला
भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत गारद केले आणि इतिहास रचला आहे. आजचा ५वा दिवस सुद्धा पावसामुळे पूर्णपणे वाया गेला आणि अखेर शेवटची चौथी कसोटी अनिर्णीत राहिली. त्यामुळे भारताने २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती