महत्वाच्या बातम्या
-
रशियाकडून ३३ फायटर जेट खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची मजुरी
एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (१२ सुखोई-३०एमकेआयएस आणि २१ मिग-२९) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. याशिवाय सध्या भारताकडे असलेले ५९ मिग-२९ लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
लडाख सीमेवर चिनी एअर फोर्सच्या हालचाली, फॉरवर्ड एअरबेसवर लढाऊ विमानं तैनात - भारतीय वायुदल
लडाखमध्ये भारत चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर, भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आयएएफ प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते येथील एअरफोर्स अकॅडमीच्या कम्बाइन्ड ग्रॅज्युएशन डे परेड निमित्त आले होते.
5 वर्षांपूर्वी -
मिराज, सुखोई आणि अपाचे हेलिकॉप्टरसह वायुसेना लडाख क्षेत्रासाठी सज्ज
चीनसोबतच्या तणावाच्यार पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) यांनी लडाख, लेह आणि श्रीनगरचा दोन दिवस दौरा केला आणि तयारीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स सीमेजवळच्या तळांवर तैनात केले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘मेक इन इंडिया’ म्हणजे काम कमी, बडबड जास्त: भारताचे हवाई दल प्रमुख
भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावरुन मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीचा उद्देश आहे. पण सध्या काम कमी आणि फक्त चर्चा सुरु आहेत. मेक इन इंडियाचा उद्देश खूप चांगला आहे. पण प्रत्यक्षात काम खूप धीम्या गतीने सुरु आहे असे भदौरिया म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल?
लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चीनच्या सीमेजवळील AN-३२ विमान बेपत्ता होताच राष्ट्रभक्ती धोनीच्या हँडग्लोव्जवर केंद्रित केली?
लोकसभा निवडणुकीत पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर डिजिटल देशभक्ती मोठ्या प्रमाणावर उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. अर्थात त्यात मोदींपासून ते भाजपच्या नेत्यांमध्ये निरनिराळी वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच रंगल्याच पाहायला मिळालं. त्यात कहर म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी तर थेट बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने तब्बल २५० दहशदवादी मारल्याचा दावा केला होता. त्याला कोणताही पुरावा स्वतः भारतीय लष्कराने किंवा वायुदलाने देखील दिला नव्हता. मात्र ते विचारणाऱ्या प्रत्येकाला भाजप समर्थकांनी राष्ट्रद्रोही घोषित करण्याचं शौर्य दाखवलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: हवाई दलाचे AN-३२ विमान बेपत्ता
भारतीय वायू दलाचे आसामहून अरुणाचल प्रदेशाच्या दिशेने जाणारे एएन – ३२ हे विमान १३ प्रवाशांसह बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. विमानात ८ क्रू मेम्बर्स आणि ५ प्रवाशांचा समावेश होता. आसामहून अरुणाचल प्रदेशाकडे जाण्यासाठी दुपारी या विमानाने उड्डाण केले. दुपारी १ वाजता या विमानाचा संपर्क तुटला.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज - उद्या होणार भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती आणि कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
पकडलेल्या भारतीय पायलटला सम्मानाने वागवा, पाकिस्तान जनतेची मागणी #SayNoToWar
पाकिस्तान एअर फोर्स ची ३ युद्ध विमानं भारतीय हद्दीत शिरताच भारतीय एअर फोर्स ने त्यांना प्रत्युत्तर देत त्यातील १ विमान हाणून पाडले परंतु त्यातील पायलट बेपत्ता असल्याची माहिती दिली. आणि या चकमकीत आपले १ विमान पाकिस्तान हद्दीत क्रॅश झाले, परंतु त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांचे प्राण वाचले.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईसह राज्यात हाई अलर्ट, दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात
पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भारत – पाकिस्तान तणाव आणखीनच वाढला आहे. काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे आहि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा
श्रीनगर, 27 फेब्रुवारी : सकाळी आलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाचे १ विमान अपघाताने कोसळले असल्याची बातमी ताजी असतानाच ‘ आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे’ असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.
6 वर्षांपूर्वी -
वाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या दाव्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने तातडीची बैठक बोलावली आणि याचे नेतृत्व पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या बैठकी नंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांच्या मते भारतीय हवाईदल पाकिस्तान हद्दीत शिरताच पाकिस्तान एअर फोर्स सतर्क झाली आणि भारतीय विमानांनी लगेच पळ काढला.
6 वर्षांपूर्वी -
How is the जोश? भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २०० - ३०० दहशदवादी ठार झाल्याचा अंदाज
या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात २०० – ३०० दहशदवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोबतच कच्छ बॉर्डर जवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन विमान देखील उध्वस्थ केल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA