Indo Rama Synthetics Share Price | इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया शेअरने 5 दिवसात 18% परतावा दिला, स्टॉक अजून तेजीत येणार? स्टॉक डिटेल्स
Indo Rama Synthetics Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग झाली आहे. अचानक शेअरची किमत वाढण्याचे कारण म्हणजे, इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया कंपनीची उपकंपनी बॉटल ग्रेड पीईटी रेझिनच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात झाली आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी रामा सिंथेटिक इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीवसह 49.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Indorama Yarns Private Limited ही इंडो रामा सिंथेटिक्स इंडियाची उपकंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील नागपूर शकतात स्थित आहे. Indorama Yarns Private Limited कंपनीने नुकताच 2 जून 2023 रोजी उत्पादन कार्याला सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी