Inflame Share Price | मागील एका महिन्यात इन्फ्लेम अप्लायन्सेस शेअरने 23% परतावा दिला, आज देखील अप्पर सर्किटमध्ये, खरेदी करावा?
Inflame Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत होती. आज देखील हा ट्रेण्ड तेजीत सुरू आहे. इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किमत वाढीचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीला विविध मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. 14 जुलै 2023 रोजी इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीला 36,000 चिमनी बनवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.55 टक्क्यांच्या वाढीसह 574.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के वाढीसह 599.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी