Infollion Research Services Share Price | लॉटरीच लागली! लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस IPO ने 154% परतावा दिला
Infollion Research Services Share Price | इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स अप्रतिम किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणुक करणाऱ्या लोकांचे पैसे लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे IPO शेअर्स 209 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 80 रुपये ते 82 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 154.87 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 188.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी