Inox Wind Energy Share Price | आयनॉक्स विंड एनर्जी स्टॉकबाबत मोठी बातमी आली, गुंतवणुकदार याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतात
Inox Wind Energy Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 2,150 रुपये या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले होते. तर आयनॉक्स विंड स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 138.50 रुपये किमतीवर आला होता. भारतातील आघडीच्या पवन ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता, आयनॉक्स विंड कंपनीने एक धोरणात्मक निर्णय म्हणून, संचालक मंडळाने आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीला आयनॉक्स विंडमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विलीनीकरण अद्याप विविध नियामक मंजुरींच्या अधीन आहे. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के वाढीसह 2,115.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी