iQOO 11 5G Smartphone | IQOO 11 5G स्मार्टफोन लाँच होण्यास सज्ज, किंमत-फीचर्स आणि बरंच काही हटके
iQOO 11 5G Smartphone | चीनची मोबाइल उत्पादक कंपनी आयक्यूओओने आपल्या आयक्यूओ ११ सीरीजचा लेटेस्ट 5G कनेक्टिविटी स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपला नवा आयक्यूओ ११ 5G फोन ८ डिसेंबरला बाजारात सादर करणार आहे. याआधी आयक्यूओ आपला फोन 2 डिसेंबरला लाँच करणार होता, मात्र चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांच्या निधनानंतर कंपनीने नव्या फोनचा लाँचिंग प्रोग्राम रद्द केला. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आयक्यूओओने या नव्या फोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी