iQOO Z6 Lite 5G | कंपनीने iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, फीचर्स आणि किंमतीसह बरंच काही जाणून घ्या
iQOO Z6 Lite 5G | आयक्यूओ आपला सर्वात स्वस्त 5G फोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीच्या या फोनचे नाव झेड६ लाइट 5G असे आहे. हा फोन १४ सप्टेंबर रोजी भारतात प्रवेश करणार आहे. अॅमेझॉन इंडियाशिवाय कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल. लाँचिंगपूर्वी युजर्सचा उत्साह वाढवण्यासाठी कंपनीने या आगामी फोनचे काही खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स कन्फर्म केले आहेत. फोनमध्ये कंपनी लेटेस्ट प्रोसेसरसोबत जबरदस्त कॅमेरा आणि डिस्प्ले देणार आहे. चला जाणून घेऊया सविस्तर.
2 वर्षांपूर्वी