IRCTC Confirm Railway Tickets | नो टेन्शन! गाव-शहरात जाताना रेल्वेच्या जास्तीत-जास्त कन्फर्म तिकिट मिळतील, हा आहे पर्याय
IRCTC Confirm Railway Tickets | लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळवणं सोपं काम नाही. सणासुदीला, विशेषत: दिवाळी आणि मे महिन्यातील सुट्टीच्या निमित्ताने तिकीट काढणं हे अवघड काम असतं. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने आरक्षणाच्या पद्धतीत बरेच बदल केले आहेत, जेणेकरून प्रवाशांना सहज तिकीट मिळू शकेल. आता रेल्वेही अधिक कन्फर्म तिकीट देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब करत आहे. कन्फर्म तिकीट मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वे विकल्प योजना. या योजनेचा अवलंब करून प्रवासी तिकीट बुक करताना प्रवासासाठी एकाच वेळी अनेक गाड्यांची निवड करू शकतात. ज्या ट्रेनमध्ये सीट रिकामी असेल, त्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.
2 वर्षांपूर्वी