IREDA Vs IRFC Share | सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण का? स्टॉकची लिस्ट पाहा, तज्ज्ञांचा काय सल्ला दिला?
IREDA Vs IRFC Share | मागील काही महिन्यापासून सरकारी कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता सरकारी शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास 70 सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने सरकारी कंपन्यांचे भाग भांडवल 10 लाख कोटी रुपयेने कमी झाले आहे. या प्रत्येक सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये सरासरी 24 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 3.34 टक्के घसरणीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
10 महिन्यांपूर्वी