महत्वाच्या बातम्या
-
Jayant Patil Alleges ED CBI IT | भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर CBI, ED आणि IT धाड टाकतात - जयंत पाटील
अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकल्या जात आहेत. भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स कारवाई (Jayant Patil Alleges ED CBI IT) करत आहे. त्यामुळे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे अधिकारी चालवत नाहीत तर भाजपचे नेते चालवतात, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. ते सांगलीच्या कुंडल येथे बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Marathwada Flood | फडणवीस सरकारच्या काळातच वाळू उपसा वाढला | जयंत पाटलांचं प्रतिउत्तर
नद्यांना मोठा पूर येण्यामागे आणि त्यातील होणाऱ्या नुकासानाला वाळू उपसा कारणीभूत ठरला आहे. तसेच, या वाळू माफियांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळू उपसा हा देवेंद्र फडणवीसांच्या काळातच (Marathwada Flood) जास्त वाढला असा पलटवार केला आहे. आता तर त्यावर काही एनजीटी (National Green Tribunal Act) सारखे कायदे आलेले आहेत. त्याबाबत आघाडी सरकार गंभीर आहे, असही त्यांनी यावेळी सांगितले आहे. ते नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing | देश सोडून पळालेल्या परमबीर यांच्या आरोपांवर केंद्रीय एजन्सीने विश्वास का ठेवावा?
अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये गेलेल्या लोकांना CBI, ED आणि आयकर विभागाचं संरक्षण आहे का? | आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो - जयंत पाटील
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शरद पवारांनी ईडीचा सामना केला | भाजपचं काम ED करतंय - जयंत पाटील
लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
3 वर्षांपूर्वी -
River Confluence Project | गुजरातकडून अधिक लाभाच्या अटी टाकल्याने नदीजोड प्रकल्पात अडचणी - जलसंपदामंत्री जयंत पाटील
नदीजोड प्रकल्पांबाबत आम्ही चर्चा करत आहोत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एमओयू होणे गरजेचे आहे. मात्र गुजरात सरकार त्यांचा लाभ आधिक होईल अशाच अटी-शर्ती टाकत आहे. त्यामुळे एमओयू होत नाही. म्हणूनच या प्रकल्पाचे काम सध्या फारसे होत नसल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत दिली.
3 वर्षांपूर्वी -
महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलंय | पण त्यावर बातम्या बनत नाहीत - जयंत पाटील
देशातील महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवलाय. आज महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमध्ये शर्यत लागली आहे. पण बातम्यांवर काहीच दाखवले जात नाही. तिकडे अमेरिका, अफगाणिस्तानबाबत सांगितलं जातं. परंतु, इकडे सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हे कोणी दाखवत नाही. फॉल्स प्रपोगंडा राबवला जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी जिंतूरच्या संवाद यात्रेत केला.
3 वर्षांपूर्वी -
ED, CBI मार्फत दिलेला त्रास भाजपला भोगावा लागेल | मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राज्यातील अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पार्टीने उद्योग सुरू केला. तुरुंगवासाच्या भीतीने अनेक जण भारतीय जनता पार्टीत गेले. परंतु, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्याला अपवाद ठरले. आरोप करणाऱ्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. मात्र, भारतीय जनता पार्टीने दिलेला त्रास हा भाजपाला सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. न्यायालयाने छगन भुजबळ यांना क्लीनचिट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया कोल्हापुरात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करणे हा भाजपचा डाव - जयंत पाटील
ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणणे, त्यांना धमकावणे आणि त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांची बदनामी करण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे, हे आता सर्वांना माहिती झाले आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. ते चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जयंत पाटील आज चाळीसगावच्या दौर्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने आणि विरोधी पक्षाशी सल्ला मसलत करुन राज्यात काम करतेय - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मोदींची भेट घेण्यापूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केल्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानभवनाच्या पायर्यांवर प्रती विधानसभा निर्माण करण्याच्या प्रयत्न | जयंत पाटील यांची कारवाईची मागणी
मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (५ जुलै) विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईविरोधात राष्ट्रवादीचं राज्यव्यापी आंदोलन | ममतांनीही तेच केलं होतं
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामान्य जनता महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रस्त आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार यावर कोणत्याही उपाययोजना देखील करताना दिसत नसल्याने सामान्यांचं जगणं कठीण होऊ बसलं आहे. कारण आता सरकारी इंधन कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी ८३४.५० रुपयांना मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा | सत्तेत येण्याची गरज नाही - जयंत पाटील
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलं. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात हजारो भाजप कार्यकर्ते विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले होते.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजपचं सरकार असल्याने फडणवीसांनी ते प्रयत्नच केले नाहीत | पण जयंतरावांनी केले
पावसाळ्यात पुराच्या पाण्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला नेहमीच अलमट्टी आणि हिप्परगा धरणातील पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना याच भागात महापुरामुळे अनेक कुटुंब बेघर झाली होती, तर अनेकांनी प्राण गमावले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्याने फडणवीसांनी नेहमीच गुळगुळीत भूमिका घेतली होती. तसेच कडक भूमिका किंवा संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नव्हेते. कायदेशीर बाब पुढे करून केवळ बचावात्मक भुमीका मांडल्याचे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मात्र सध्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र थेट कर्नाटकात जाऊन संवाद सुरु केल्याने प्रश्न निकाली लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज राष्ट्रवादीची परिस्थिती आणखी चांगली असती - जयंत पाटील
आज (१० जून) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खंत व्यक्त केली आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाचा प्रवास उलगडताना महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीत आपल्या पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार | जयंत पाटलांचं मोठं विधान
मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी यांच्यात देखील अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही? - जयंत पाटील
महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?,अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. “महाराष्ट्र झोपेत असतानाच महाविकास आघाडी सरकार जाईल. कळणारचं नाही, कधी गेलं,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पंडित नेहरूंच्या स्मृतीदिन | जयंत पाटलांनी शेअर केला वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ
भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय जडणघडणीत नेहरूंचा सिंहाचा वाटा होता. मात्र २०१४ नंतर आलेल्या मोदी सरकारने आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या अज्ञानातून त्यांना केवळ बदनाम करण्याचा घाट घातल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा? | जयंत पाटलांचे सूचक ट्विट
केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार आली आहे. त्यामुळे, भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन?
निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ केली जाते. हे काय वित्त नियोजन आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल