महत्वाच्या बातम्या
-
JEE Exam Updates | मुख्य परीक्षेसाठी १२'वीत 75 टक्के गुणांची अट रद्द
जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान ७५ टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी ७५ टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. आयआयटी जेईईसाठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी इयत्ता बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
JEE Advanced 2020 Results | एकूण 43 हजार विद्यार्थी उत्तीर्ण
JEE Advance 2020 चा निकाल नुकतंच जाहीर करण्यात आला आहे. जवळपास 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यातील पेपर 1 आणि 2 मध्ये जवळपास 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 6 हजार 707 विद्यार्थिनी आहेत.
4 वर्षांपूर्वी -
JEE Advanced 2020 | परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी या सूचना लक्षात घ्या
JEE Advanced 2020: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली JEE Advanced परीक्षा रविवारी २७ सप्टेंबर रोजी देशभरात होत आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांना कोविड-१९ प्रादुर्भावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर
जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. विद्यार्थी, पालक आणि हा निकाल जाऊन घेऊ इच्छिणारे सर्व jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले गुणपत्रक पाहू किंवा डाऊनलोड करु शकतात. तसेच आपल्या गुणपत्राची प्रिंटही काढू शकतात. दरम्यान जेईई मेन परीक्षा पास होणारे विद्यार्थी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी 12 सप्टेंबर 2020 पासून नोंदणी सुरु होणार आहे. जेईई अडवान्सड परीक्षा 27 सप्टेंबरपासून आयोजीत केली जाणार आहे. जर आपण जेईई मेन एग्जाम रिजल्ट तपासून पाहू इच्छित असाल तर खालील पद्धतीचा वापर करा.
4 वर्षांपूर्वी -
JEE - NEET | महाराष्ट्र सह 6 राज्यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना NEET-UG आणि JEE Mains 2020 च्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्र सह देशातील 6 राज्यांच्या मंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र आज कोर्टाने त्या फेटाळून लावल्या आहे. 17 ऑगस्ट दिवशी सुनावणी करताना कोर्टाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार, देशभर जेईई मेन्स आणि नीट 2020 ची परीक्षा होईल असं म्हटलं होतं. दरम्यान देशात 1 सप्टेंबर पासून जेईई मेन्स परीक्षा सुरू झाली आहे. त्या 6 सप्टेंबर पर्यंत घेतल्या जातील.
4 वर्षांपूर्वी -
JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी | मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोना महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी. यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी तसेच येत्या 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
NEET-JEE परीक्षा संदर्भात ७ राज्य सुप्रीम कोर्टात जाणार, सोनिया गांधींच्या बैठकीत निर्णय
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
JEE आणि NEET परिक्षा घेण्यावरून स्वामींचा मोदी सरकारला 'विपरीत बुद्धी' टोला
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सतत विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. “जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती,” असं त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE-NEET परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर पालक आणि विद्यार्थ्यांचा दबाव होता - केंद्रीय शिक्षणमंत्री
महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या MHCET अर्थात अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MHCET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं त्यावरून याचिकाकर्त्यांना फटकारत मागणी फेटाळून लावली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO