JioPhone 5G | जिओ 5G स्मार्टफोनची किंमत इतकी स्वस्त असणार आहे, किंमत आणि फीचर्सचा तपशील जाणून घ्या
JioPhone 5G | रिलायन्स जिओने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम २०२२) लवकरच गुगलच्या भागीदारीत विकसित करण्यात येत असलेला अल्ट्रा-अफोर्डेबल ५जी स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली. तेव्हापासून या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. आता काउंटरपॉईंटने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, रिलायन्स जिओच्या 5 जी स्मार्टफोनची किंमत 8000 ते 12000 रुपयांदरम्यान असू शकते. अशी अपेक्षा आहे की जिओफोन ५ जी स्मार्टफोन ऑगस्ट २०२३ मध्ये लाँच होईल.
2 वर्षांपूर्वी