महत्वाच्या बातम्या
-
आव्हाडांवर गुन्हा दाखल करणारी भाजप महिला पदाधिकारी रिदा अजगर रशीद सुद्धा वादात, विरोधात गुन्हे दाखल, सध्या जामिनावर?
MLA Jitendra Awhad | चित्रपटगृहात जाऊन शो बंद केल्याच्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार महिलेनं केलीये. यावरून वादविवाद सुरू झालेले असताना त्या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय.
2 वर्षांपूर्वी -
Jitendra Awhad Arrested | अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांना आधी अटक नंतर तत्काळ जामीन
इंजिनियर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या ट्विटरवरून दिली आहे. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करून कोर्टात हजर केलं असता कोर्टाने जामीन देखील मंजूर केल्याचं (Jitendra Awhad Arrested) ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar on Godse Film | महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेवर ते चित्रपट करत असल्याची माहिती द्यांनी दिली. महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकरांनी चित्रपटाचा टीजर शेअर केला. मात्र मांजरेकरांच्या या घोषणेनंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया (Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar on Godse Film) नोंदवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
बिल्डरांनी रखडवलेले SRA प्रकल्प ताब्यात घेणार - जितेंद्र आव्हाड
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
पेगासस हेरगिरी | केंद्र सरकार लोकांचे व्हाट्सअँप, इमेल, SMS, पेमेंट हिस्ट्री, मोबाईल असं सर्वच पाहातंय
संसदेत शुक्रवारीही पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. सरकारने विरोधकांशी समेटाचे संकेत शुक्रवारी दिले होते. लोकसभा स्थगित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विरोधकांकडे अजूनही पर्याय आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी दिलेल्या वक्तव्यावर विरोधक स्पष्टीकरण मागू शकतात. पण मंत्री राज्यसभेत निवेदन करत असताना त्यांच्या हातातील कागद ओढून फाडले गेले.’
3 वर्षांपूर्वी -
महाड आपत्ती | पवारांच्या सूचनेनंतर आव्हाडांची घोषणा | पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली
महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम देणार | आव्हाडांना आनंद
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
'करेक्ट कार्यक्रम' हा शब्द देखील चोरल्यासारखा वाटतो - जितेंद्र आव्हाड
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. करेक्ट कार्यक्रम हा शब्द प्रयोगावरुन सध्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरुन विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्हाडा मुंबईत काम करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उभारणार | सुप्रिया सुळेंची मागणी पूर्णत्वाला
मुंबईत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत ताडदेवमध्ये 1 हजार महिलांसाठी (वर्किंग वुमन्स) हॉस्टेल उभं करण्यात येणार आहे. तशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तीन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पुर्तता केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स तरीही ते जवाबदारीने...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. ते म्हणाले की, “बंगाल, आसाम अशा आणखी काही राज्यात निवडणूका आहेत तिथे कोरोना वाढत नाही का? तर मी त्यांना सांगू इच्छितो की मला तिथे काय सुरू आहे त्याबद्दल बोलायचं नाही
4 वर्षांपूर्वी -
भारतात झालेल्या कोरोना लसीकरणापेक्षा अधिक लसी मोदी सरकारने निर्यात केल्या आहेत हे...
देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच देशात गेल्या चोवीस तासात 56,119 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहे. हा आकडा सलग सहाव्या दिवसांपासून सतत वाढतच आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये 36,983 लोक बरे झाले असून यात 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये 18,883 आकड्यांनी वाढ झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवसापासून सक्रीय रुग्णांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांचा आकडा 60 हजारांवर गेलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अपक्ष आमदार येड्रावकर यांनी भाजपासोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी त्यांची भेट घेतली होती
पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे सरकार अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा डाव आता भाजपवरच उलटणार असल्याची शक्यता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळे निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
झोपडी पाडल्यापासून SRA प्रकल्पातील घरे ५ वर्षांनी विकता येणार | लवकरच नियमात बदल
SRA प्रकल्पातील सदनिका ५ वर्षांनी विकण्याची मुभा देतानाच हा कालावधी झोपडी पाडल्यापासूनचा गृहीत धरावा, यासाठी लवकरच नियमात बदल करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सांगितले. म्हाडा व एसआरएच्या संयुक्त विद्यमाने कोळीवाडे वगळता मुंबईतील किनाऱ्यालगतच्या झोपडपट्टयांच्या विकासाबाबत दीड महिन्यात धोरण तयार करणार असल्याचे देखील जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगत आहे.
4 वर्षांपूर्वी -
SRA घरं | घरं विकण्याची कालमर्यादा 10 वरून ५ वर्ष | निम्म्याने घट
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना विकण्याच्या कालमर्यादेसंबंधीचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या नव्या निर्णयांतर्गत राज्य सरकारने SRA अंतर्गत मिळालेली घरे 5 वर्षाच्या नंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी ही घरं विकण्याची कालमर्यादा 10 वर्षांची होती. ही माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही | कॅनडाच्या अक्षयला भारतावर बोलण्याचा अधिकार काय?
सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यावंर टीकास्त्र डागलंय.
4 वर्षांपूर्वी -
पूर्वी राजकारणात गणेश नाईकांना मानाचं स्थान होतं | भाजपमध्ये बसायलाही खुर्ची मिळाली नाही
भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील साम्राज्याला हादरा देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत गणेश नाईक यांना हादरा दिल्यास त्यांचं राजकीय भविष्य देखील टांगणीला लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. परिणामी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मागील 20 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत वर्चस्व आहे आणि तेच मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंचा प्रवेश | राष्ट्रवादीत अंतर्गत कलह | आव्हाडांचं मंत्रिपद जाणार? त्या बदल्यात...
मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान केले
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
4 वर्षांपूर्वी -
अक्षय तू कार वापरणं बंद केलं आहेस का? वर्तमानपत्र वाचत नाहीस का? - जितेंद्र आव्हाड
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आज सलग १९व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.०२ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यासह राजधानीत डिझेलच्या दराने पहिल्यांदाच ८० रुपयांचा टप्पा पार केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना